Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रदुसऱ्या टप्प्यातील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान

दुसऱ्या टप्प्यातील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान

मुंबई-राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील १८ जिल्ह्यातील ३ हजार ६९२ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज ४,११९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार होतं. मात्र, ३८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली नाहीत, तर काही ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज एकूण ३,९६२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत झाले.

यामध्ये ठाणे- १४, पालघर- ५६, रायगड- २४२, रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग-३२५, पुणे- २२१, सोलापूर-१९२, सातारा- ३१९, सांगली-४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर-२३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२,भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६ अशा एकूण ३६९२ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments