Saturday, May 4, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादपैशाचे आमिष दाखवून २५ वर्षीय विवाहितेला राजस्थानात विकले!

पैशाचे आमिष दाखवून २५ वर्षीय विवाहितेला राजस्थानात विकले!

औरंगाबाद – केटरिंगच्या व्यवसायात राजस्थानमध्ये खूप पैसे मिळतात, असे आमिष दाखवून एका विवाहितेला मुकुंदवाडीतील दलालाने राजस्थानात विकले. तिथे ४० वर्षीय व्यक्‍तीसोबत तिचे बळजबरीने लग्न लावून दलाल पसार झाला. अखेर, वृद्ध आई आजारी असल्याचा बहाणा करुन पीडितेने राजस्थानमधून आपली सुटका करुन घेत घर गाठले. त्यानंतर राजस्थानमध्ये महिलांना विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणात पोलिसांनी मुकुंदवाडीतील पवन नावाच्या दलालाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याशिवाय फरजाना नामक महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय विवाहिता ३ मुलांसह राहते. ती याच भागातील एका घरी भांडी धुण्याचे काम करते. तिला आणखी काही ठिकाणी कामाची आवश्यकता असतानाच नारेगावातील फरजाना नावाच्या महिलेशी तिची ओळख झाली. महिनाभरापूर्वी फरजानाने तिला पैसे कमावण्यासाठी राजस्थानमध्ये जाण्याचा सल्ला दिला. केटरिंगच्या व्यवसायात तिकडे खूप पैसे मिळतात, असे आमिष तिने दाखविले. तसेच, तिची तिन्ही मुले येथे सांभाळते, असेही सांगितले.

फरजानाने पीडितेला राजस्थानमध्ये गेल्यानंतर १ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविले होते. त्यानुसार, तिला राजस्थानला नेण्यासाठी मुकुंदवाडीतील पवन नावाच्या दलालाला बोलावून घेण्यात आले. त्याने पीडितेला राजस्थानला नेले. तेथे एका ४० वर्षीय चहा विक्रेत्याशी तिचे लग्न लावून दिले. त्याच्याकडून काही पैसे घेऊन तो माघारी आला. चहा विक्रेत्याने पीडितेला काही दिवस घरातच कोंडून ठेवले. तिचा पती जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो हर्सुल कारागृहात आहे. त्याच्या जामिनासाठी काम करुन पीडिता रुपये जमवत आहे. परंतु, यातच तिला अनेकांनी गंडवले.  तसेच, चक्क राजस्थानला नेऊन विकले. आई आजारी असल्याचे कारण सांगून महिलेने औरंगाबाद गाठत पोलिसात आपली तक्रार दिली. मुकुंदवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.

गुजरातमध्ये लावून दिले लग्न…..

घरची गरिबीची परिस्थिती बघून गरिब कुटुंबियांना हेरणी टोळी औरंगाबाद शहरात कार्यरत असून, तुमच्या मुलींचे श्रीमंत कुटुंबियांमध्ये लग्न लावून देतो असे सांगून गरिब मुलींना विकण्यात आले. अशा अनेक घटना गेल्या काही महिण्यांपासून सुरु आहेत. मात्र बदनामी होऊ नये किंवा गरिबीमुळे अशा घटनांची वाच्याता कुटुंबियांकडून होत नाही. मात्र या प्रकारातून अनेक टोळ्या पैसा कमवत आहे. अशीही कुजूबुज मुस्लिम बहुल परिसरात सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments