Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजन'टायगर जिंदा है'ला बंपर ओपनिंग!

‘टायगर जिंदा है’ला बंपर ओपनिंग!

‘टायगर जिंदा है’ या सलमान, कतरिनांनी अभिनय केलेल्या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली आहे. अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सामान्य प्रेक्षकांपासून चित्रपट समिक्षकांनी देखील पसंती दर्शविली आहे.

शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाला तब्बल ३८ कोटींची ओपनिंग मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बंपर ओपनिंगमुळे ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट २०१७ या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरू शकतो. याच वर्षात प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाने २०६ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड ‘टायगर जिंदा है’ तोडणार का हे बघने औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments