Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेतील १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे ; यांना परत उमेदवारी मिळणार का?

विधानसभेतील १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे ; यांना परत उमेदवारी मिळणार का?

विधानसभेतील आमदारांवर खून, अपहरण, दरोडा, जातीय तणाव व महिलांशी संबंधित गुन्हायांमध्ये वाढ

 

२८८ पैकी १६५ आमदारांवर गुन्हे, त्यापैकी ११५ जणांवर गंभीर गुन्हे. ज्या विधीमंडळात कायदे बनतात त्याच विधानसभेतील २८८ पैकी तब्बल १६५ म्हणजेच ५७% आमदारांवर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, धार्मिक तणाव आणि महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. ११५ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ५१ आमदारांवर गुन्हे निश्चितही झाले आहेत. सर्वाधिक गुन्हे असणारे आमदार शिवसेना-भाजप युतीचेच आहेत. २००९ च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या तुलनेत युती सरकारमध्ये गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेल्या आमदारांची संख्या २९ ने वाढली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष या गुन्हेगारी प्रकरणातील आमदारांना पुन्हा तिकीट देतील का असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

शिवसेना आणि भाजपने २०१४ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. मात्र पार्टी विथ डिफरन्स म्हणत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने निकालानंतर शिवसेनेशी हातमिळवणी केली. भाजपचे १२२, शिवसेना ६३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ तर काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले. मात्र, यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्राच्या विश्लेषणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

 आमदार आणि त्यांच्यावरील गुन्हे

  • ९ आमदारांवर दाखल आहेत अपहरणाचे गुन्हे,

यात ३ भाजपचे, ५ राष्ट्रवादीचे, तर १ शिवसेना आमदार

  • 115 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल,

प्रकरणात आमदारांवर गुन्हे निश्चितीकरण

  • 03 आमदारांवर खुनाचे गुन्हे आहेत. यात २ भाजपचे तर सेनेचा १ आमदार आहे.
  • 03 आमदारांवर जातीय तणाव पसरवण्याचे गुन्हे
  • 15 आमदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे; भाजप ५, शिवसेना ७, राष्ट्रवादी २, अपक्ष १
  • 11 आमदारांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल; भाजप 5 | शिवसेना 6

पैकी ८ आमदारांवर महिलेवर हल्ला, विनयभंगाचा गुन्हा

  • 14 आमदारांवर दरोडा आणि लुटीचे गुन्हे,

भाजप 5 | शिवसेना 6 राष्ट्रवादी 2 | माकप 1

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments