Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रहारच्या कोपरी पाचपखाडी विधानसभा अध्यक्षपदी सुनील तिवारी

हारच्या कोपरी पाचपखाडी विधानसभा अध्यक्षपदी सुनील तिवारी

 
सामाजिक कार्यकर्ते सुनील ( मुन्ना) तिवारी यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोपरी पाचपखाडी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
सुनील ( मुन्ना) तिवारी यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोपरी पाचपखाडी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते सुनील तिवारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी ठाणे जिल्हा तथा पालघर संपर्कप्रमुख हितेश जाधव,ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रेम प्रधान आदी यावेळी उपस्थित होते.
 
सुनील तिवारी यांचे सामाजिक क्षेत्रात भरीव असे काम आहे. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आजपर्यँत राबिवले असल्याने राजकीय क्षेत्रात ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सामाजिक क्षेत्रातील काम आणि नागरिकांशी असलेला चांगला सपंर्क यामुळे एक चांगला कार्यकर्ता पक्षाला मिळाल्याची भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांच्यातील सामाजिक वृत्ती  व नागरिकांशी असलेला संपर्क लक्षात घेऊन त्यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोपरी पाचपखाडी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्ष संघटन वाढवण्यासाठी निष्टेने काम करू असे यावेळी सुनील तिवारी यांनी सांगितले
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments