skip to content
Monday, May 20, 2024
Homeविदर्भनागपूरराहुल आग्रेकर हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला कोलकात्याहून अटक

राहुल आग्रेकर हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला कोलकात्याहून अटक

नागपूर: नागपूर लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि खून करुन मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पंकज हारोडे हा फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. अखेर त्याला नागपूर पोलिसांनी   कोलकात्याहून अटक केली.

नागपुरात अपहरण केलेल्या राहुल आग्रेकर या लॉटरी व्यापाऱ्याची जाळून हत्या करण्यात आली होती. १ कोटी रूपयांच्या खंडणीसाठी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी  राहुल यांचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी कुटुंबियांना फोन करून १ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी राहुल यांच्या शोधासाठी पथकं पाठवली होती.

दरम्यान, बुटीबोरी येथे जळालेला मृतदेह मिळाला होता. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचाच असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी लॉटरी सेंटर चालविणाऱ्या आणि राहुल यांचा मित्र असलेल्या दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोन संशयित आरोपींचा पोलिसांनी सोध सुरू केला.

या दोघांसोबत बोलेरो वाहनातून राहुल गेले होते. नंतर बुटीबोरी भागात त्यांची हत्या करण्यात आली. अखेर या प्रकरणी मध्यप्रदेश व्हाया कोलकाता असा प्रवास माग काढत पोलिसांनी मुख्य आरोपी पंकज हारोडेच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखी एक आरोपी दुर्गेश बोकडे अजूनही फरार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments