Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकराज्यात सर्वाधिक थंडीने नाशिक गारठले!

राज्यात सर्वाधिक थंडीने नाशिक गारठले!

नाशिक : शहरासह जिल्हा पुन्हा गारठला असून किमान तपमानात सातत्याने घसरत होत असून पारा रविवारी ७ जानेवारी रोजी पुन्हा ८ अंशापर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची कमालीची तीव्रता जाणवली. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. पहाटे जॉगिंग ट्रॅकवरील फेरफटका मारणा-यांची गर्दी रविवार असूनही ओसरली होती.

मागील बुधवारपर्यंत शहराचे किमान तपमान १० अंशाच्या पुढे सरकलेले होते. यामुळे बोच-या थंडीपासून नागरिकांना काही अंशी दिलासाह मिळाला होता; मात्र गुरूवारपासून पुन्हा तपमान घसरू लागल्याने थंडीची तीव्रतेतही वाढ होऊ लागल्याने नाशिककरांकडून शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरूवात झाली. १०.६ अंशापर्यंत वर सरकलेला पारा थेट ८ अंशापर्यंत खाली आला आहे. नाशिकमधील निफाड तालुका सर्वाधिक गारठला असून तपमान ८ अंशापेक्षाही खाली घसरले आहे. संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती. मात्र किमान तपमानाचा पारा या आठवड्यात दोनवेळा पुन्हा वर सरकल्याने थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिकांकडून व्यक्त होत होती, परंतु शनिवारपासून तपमान कमालीचे घसरू लागले. रविवारी ८ अंशावर पारा आल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाश्किची नोंद झाली. एकूणच वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर हैराण झाले आहे. दिवसाही नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रमुख शहरांचे किमान तपमान असे
मालेगाव ११.६, जळगाव ८.२, सातारा १२.२, नागपूर ११, सांगली १४.८, महाबळेश्वर ११.५, अहमदनगर ११.२, पुणे १०.९, कोल्हापूर १६.३, सोलापूर १३.९, परभणी १२.२, रत्नागिरी १५.८, नांदेड १३,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments