Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

भाईंदर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. केबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑफ केलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वीही तीन वेळा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरारोड येथे नवीन वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या आगमनासाठी बुधवारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या मैदानात हैलिपॅड तयार करण्यात आले होते. हेलिकॉप्टर लँडिंगवेळी तेथील ओव्हरहेड वायरचा अडथळा होऊ नये, यासाठी त्या काढण्यात आल्या होत्या. दुपारी १२:४५ ते १ वाजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होतेवेळी दोन इमारतींच्यामध्ये लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. पायलटला जर वेळीच केबलची तार दिसली नसली तर हेलिकॉप्टर लँड होताना त्याचे पंखे वायरमध्ये अडकून मोठा अपघात घडला असता. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते.

यापूर्वीच्या घटना –

नाशिकमध्ये
९ डिसेंबर २०१७ रोजी हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.

रायगडमध्ये
७ जुलै रोजी मुख्यमंत्री अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळा आटोपून डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीने सांगितले.

 काय घडले होते लातुरात
२५ मे रोजी लातुरात मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही. पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले होते. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले होते. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments