Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeविदर्भनागपूरनारायण राणे यांना मंत्रिपद दिले जाईल - देवेंद्र फडणवीस

नारायण राणे यांना मंत्रिपद दिले जाईल – देवेंद्र फडणवीस

नागपूर – काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे. मंगळवारी नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन केले जाईल असे स्पष्ट केले. खडसे आणि नारायण राणे दोघांचा अनुभव पक्षासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिणीच्या वृत्तानुसार नारायण राणे यांना भाजपाच्या कोटयातून मंत्रिपद दिले जाणार आहे असे फडणवीस म्हणाले.  भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल झालेले नारायण राणे  राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. नारायण राणेंचे भाजपामध्ये पुनर्वसन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांनी दोन आठवडयांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना कोल्हापूरमध्ये आपण लवकरच मंत्री बनू असे म्हटले होते. आता मुख्यमंत्र्यांनीही तसेच संकेत दिल्याने राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे तसेच सध्या सरकारबाहेर असल्याने अस्वस्थ असलेल्या एकनाथ खडसे यांच्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण विधान केले.

पुर्नवसन विस्थापितांचे होते, खडसे तर प्रस्थापित नेते आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ खडसे सध्या आपल्याच सरकारला घरचा आहेर देत आहेत.  खडसे यांनी सोमवारी प्रत्येक मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. चार वर्षांपासून एकच ऐकतोय, जे शक्य आहे, तेच सांगा. हे काय सरकार आहे का? अशा शब्दांत त्यांनी विविध मंत्र्यांना धारेवर धरीत सरकारचे कान टोचले. खडसे यांच्या प्रश्नांनी सरकर अडचणीत येत असल्याने विरोधकांनीही त्यांना साथ दिली.

सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासूनच एकनाथ खडसे यांचे उग्र रूप सरकारला पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हाफकीन महामंडळाशी संबंधित पहिलाच प्रश्न होता. त्यावर उपप्रश्न सादर करीत एकनाथ खडसे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शासनाच्या हलगर्जीपणामुळे संशोधन बंद पडले आहे. संशोधकांना योग्य वेतन नाही. संशोधनाला चालना मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला. खडसे यांचे उग्र रूप पाहून बापट यांनी ‘सजेशन फॉर अ‍ॅक्शन’ असे उत्तर दिले.

यानंतर तिसरा प्रश्न हा स्वत: एकनाथ खडसे यांचाच होता. त्यावर त्यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. ५१ गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न घेऊन मी स्वत: मंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्री स्वत: बोलले, तरी काम व्हायला पाच महिने लागतात. हे काय चालले आहे. हे राज्य आहे की काय? अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments