Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeविदर्भनागपूर'जयचंद' तब्बल तीन तासानंतर कालव्यातून बाहेर!

‘जयचंद’ तब्बल तीन तासानंतर कालव्यातून बाहेर!

नागपूर – तुम्ही जंगलात रुबाबदार वाघाची ऐट पाहिली असेल, पण पाण्यात पोहणारा वाघ क्वचितच पाहिला असेल. हे चित्र गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पाहायला मिळाले. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध जयचंद वाघ आज दुपारी पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर कॅनॉलमध्ये पडला होता. तब्बल तीन तासानंतर वाघाला वनविभागाने पाण्यातून बाहेर काढले.

वाघ पाण्यात पडल्याचे समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली होती. वनविभागाने वाघाला पाण्यातून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅनॉलमध्ये मॅट सोडले, पण वाघाने त्यांची मदत घेतली नाही. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मॅटवर शिडी लावून जयचंदला बाहेर काढले. अशाप्रकारे मोहीम जयचंद फत्ते झाली.
जयचंद वाघ तब्बल ३ तास पाण्यात होता. वनविभागाच्या ऑपरेशनमध्ये अवघ्या दीड तासात त्याला बाहेर काढण्यात आले. कालव्यातून बाहेर पडताच वाघाने धूम ठोकली.
दरम्यान कालव्यात रब्बी पिकांसाठी सोडलेल्या पाण्यामुळे जयचंद वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला अडचणींचा सामना करावा लागला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments