Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव जवळपास निश्चित

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव जवळपास निश्चित

मुंबई : विधानपरिषदेची पोटनिवडणूकीसाठी  काँग्रेसनं सोलापूर दक्षिण चे माजी आमदार दिलीप माने याचं नाव राज्य पातळीवरून निश्चित केलंय. त्याबद्दलचा अंतिम निर्णय दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेणार आहे. विधानपरिषदेची निवडणूक ही चुरशी होणार असून, भाजपाकडून उमेदवार कोण याचा घोळ पक्षपातळीवर सुरुच आहे.

विधान परिषदेचा उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली.

आज झालेल्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत खा. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अॅड. गणेश पाटील उपस्थित आहेत.

कोण आहेत दिलीप माने?

-दिलीप माने हे कॉंग्रेसचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

– सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष.

– दिलीप माने हे माजी आमदार कै. ब्रह्मदेव माने यांचे चिरंजीव.

– सिध्दनाथ साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन.

– कॉंग्रेसचे नेते आणि आमदार पतंगराव कदम यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments