Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबादचे महापौरपद रद्द करा, एमआयएमची मागणी

औरंगाबादचे महापौरपद रद्द करा, एमआयएमची मागणी

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे महापौरपद रद्द करावे अशी मागणी करत त्या संदर्भातले एक पत्रच आज एमआयएमने विभागीय आयुक्तांना दिले. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. एमआयएम आणि शिवसेना या दोघांचीही एकमेकांवर कुरघोडी सुरु आहे. औरंगाबाद शहरातील दमडीमहल भागात अतिक्रमणावर होणाऱ्या कारवाईच्या वेळी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला असा आरोप करत एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्त्व रद्द करण्याचा प्रस्ताव महापौर नंदकुमार घोडेले यांनी तयार केला. या प्रस्तावानंतर एमआयएमने आक्रमक पवित्रा घेत महापौर पदच रद्द करण्याची मागणी केली.

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना एमआयएमच्या शिष्टमंडळानं निवेदन दिले. औरंगाबाद महानगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीर काम चालत असून नियमबाह्य पद्धतीनं सभा चलवली जाते. फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत १९० पेक्षा जास्त प्रस्ताव ऐनवेळी मंजूर करण्यात आले. हे सगळे नियमबाह्य आहे असे सांगत महापौरपद रद्द करण्याची मागणी एमआयएने केली. दमडीमहल येथील अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवत फेरोज मोइनोद्दीन, नासेर सिद्दीकी, जमीर कादरी, सरवत बेगम आरेफ हुसैन, साजेदा बेगम सईद फारुखी या पाच नगरसेकांचे पद रद्द करण्या संदर्भात दिलेला निर्णय बेकायदेशीर आहे. विशेष म्हणजे महिला नगरसेवक घरी होत्या. फक्त त्यांचे पती घटनास्थळी असल्यानं कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदाचा गैरवापर करून हा निर्णय घेण्यात आल्याने महापौरांवर करवाईची मागणी करण्याची विनंती विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.  या संपूर्ण प्रकरणात आवश्यक असल्यास पुरावे देखील देऊ असेही एमआयएमने विभागीय आयुक्तांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments