Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकले

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकले

महत्वाचे…
१.अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपीं कबुली २. अमरावतीमध्ये पालकांमध्ये संतापाची लाट ३. या प्रकरणावरुन मुलींच्या मनात भिती


अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमातून उकळतं तेल फेकल्याची धक्कादायक घटना घडाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तरुणीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींनी पोलिसांना कबुली दिली अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारावरुन मुली पुन्हा असुरक्षित असल्याचे समोर आले.

एकतर्फी प्रेमातून मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास दोन आरोपींनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती १२ टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे अमरावतीत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments