Placeholder canvas
Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्र३,१३१ ग्रामपंचायतींचे आज निकाल

३,१३१ ग्रामपंचायतींचे आज निकाल

राज्यातील १६ जिल्ह्यांमधील ३ हजार १३१ ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. यंदा पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे. यासोबतच ग्रामीण जनतेचा कल नेमका कोणाला, याचेही चित्र स्पष्ट होणार आहे. ८ ऑक्टोबरला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते.

औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर या जिल्ह्यांमधील एकूण ३ हजार १३१ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आता ग्रामपंचायतींमध्येही नगरपालिकांप्रमाणेच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. याचा फायदा भाजपला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात नाशिकमधील १५०, धुळ्यातील ९६, जळगावातील १०१, नंदुरबारमधील ४२, अहमदनगरमधील १९४, औरंगाबादमधील १९६, बीडमधील ६५५, नांदेडमधील १४२, परभणीतील १२६, जालन्यातील २२१, लातूरमधील ३२४, हिंगोलीतील ४६, अकोल्यातील २४७, यवतमाळमधील ८०, वाशिममधील २५४ आणि बुलडाणातील २५७ ग्रामपंचायतींसाठी ८ ऑक्टोबरला मतदान झाले. त्यांची मतमोजणी आज होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments