सांगली: येथील वानलेस चेस्ट हॉस्पीटलच्या क्वॉटर्समध्ये डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. राहूल जयेंद्र लोंढे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही. चौघांना संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत नोंद झाली आहे.