Thursday, September 12, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेशिवसेना शहर प्रमुखांच्या गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडलं

शिवसेना शहर प्रमुखांच्या गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडलं

पुणे– बारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलींना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे. गुरूवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. आंजणगावच्या सोमेश्वर शाळेत या मुली परीक्षेला जात असताना ही घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे.  आठवीत शिकणाऱ्या दिव्या पवार आणि सातवीत शिकणाऱ्या समिक्षा विटकर या विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू झाला.

बारामतीचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने यांची ही गाडी असल्याची चर्चा आहे. पप्पू माने स्वतः गाडी चालवत असताना हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिल्याची माहिती मिळते आहे.

अंजनगाव गाव मधील सोमेश्वर विद्यालयाच्या या विद्याथीर्नी होत्या पहिल्या. शाळेत परीक्षा चालू आहेत. या विद्याथीर्नी परीक्षा देण्यासाठी चालल्या होत्या .मोरगावच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कारने या विद्याथीर्नींना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

अपघातानंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिली तसंच रस्ता अडविला. ग्रामस्थांच्या रास्तारोकोमुळे बारामती—पुणे मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे .सुमारे ३ किमी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments