Saturday, October 12, 2024
Homeमनोरंजनमाध्यमांनी नि:पक्ष काम करावे- किशोरी शहाणे

माध्यमांनी नि:पक्ष काम करावे- किशोरी शहाणे

ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी चित्रपटसृष्टीतील आव्हाने,नवख्या कलाकारांना संधीसाठी करावी लागणारी मेहनत. चित्रपट सृष्टीतील भवितव्य. नवख्या कलाकारांना चित्रपट सृष्टीत संधी मिळाली नाही तर शिक्षणाच्या जोरावर दुसरीकडे रोजगाराची संधी मिळले ही तयारी ठेवावी. विविध प्रश्नांवर दिलखुलास पणे अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी उत्तरे दिली. रविवारी आफ्टरनून  व्हॉईसच्या गेस्ट एडिटर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांनी ऑफ्टरनून व्हॉइस,मुंबई माणूस डिजिटल पोर्टलच्या संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. माध्यमांनी  नि:क्ष काम करावे असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी न्यूजमेकर्सच्या संचालक, आफ्टरनून व्हॉईसच्या संपादक वैदेही ताम्हण उपस्थित होत्या.

प्रश्न: आपण गेस्ट एडिटर म्हणून पत्रकारांना काय सूचना कराल?

पत्रकारांनी बातमीची सत्यता बघून ‘बातमी’सोडायला हवी. बातमी ही निष्पक्ष: असावी. राजकीय पक्षांची असो की इतर कोणतीही बातमी असो, एकतर्फी बाजू मांडता कामा नये. बातमीत सत्यपणा असला पाहिजे अन्यथा वाचकांचा बातमी वरील विश्वास उडून जातो. माध्यमांची विश्वासार्हता नष्ट होते.

प्रश्न : तुमच्या क्षेत्रात सर्वात मोठ यश काय आहे?

मला माझ्या मेहनतीच्या जोरावरच खूप चित्रपटात, मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मला खूप पुरस्कारही मिळालेत. मी कठोर मेहन करते. मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. मेहनती शिवाय सर्व काही अशक्य आहे. संघर्ष केल्यानंतर संधी आपल्याकडे चालून येतात. याच्यावर माझा विश्वास आहे.

प्रश्न: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते नाना पाटेकर यांना ‘चोंमडेपणा’ करु नका असा दम दिला. तो कितपत योग्य आहे? कलाकारांबद्दल एक आणीबाणी सारखी परिस्थिती आपणास वाटते का?

कलाकारांनी बोलतांना विचार करतांना बोलावे. राजकीय पडसाद उमटणार नाहीत याचाही भान ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या कलाकाराने आपले मत व्यक्त केल्यानंतर त्याला एका राजकीय पक्षाचा विरोध होतो तर दुसरा राजकीय पक्ष त्याच्या समर्थनार्थ येतो. राजकीय पक्षाची मंडळी कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे अशा घटना घडत असतात.

प्रश्न: पूर्वीच्या कलाकारांपेक्षा आताचे कलाकार जास्त मेहनत घेत नाही. आपणास काय वाटते?

पुर्वी सुविधा नव्हत्या. नाटक बघून, पुस्तक वाचून कलाकार ती कला आत्मसात करुन काम करत असतात. आता सुविधा भरपूर आहेत. कलाकारांना चांगला कलाकार बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. पूर्वी कलाकारही कमी होते. पूर्वी संधी कमी होत्या. आता बरेच कलाकार आहेत, संधी आहेत त्यासाठी नौख्या कलाकारांना मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही.

प्रश्न: जाडुबाई जोरात या मालिके बद्दल आपला अनुभव कसा आहे?

जाडुबाई एक कॉमेडी मालिका असून, मला काम करतांना खूप आनंद मिळतो. मी खूप वर्षानंतर टिव्ही सिरीयलमध्ये परतले असून मला वेगळाच आंनद मिळतो. ही मालिका एक कॉमेडी मालिका असून मी निगेटीव्ह भूमिका साकारत आहेत. कोणतीही भूमिका साकारत असतांना त्यामध्ये स्वत:ला झोकून दिल्यानंतर कामाचा आनंद वेगळाच असतो.

प्रश्न: पूर्वीच्या चित्रपटात आणि आताच्या चित्रपटात काय फरक जाणवतो?

पूर्वीच्या चित्रपटात वेगवेगळे विषय हाताळले जात होते. त्यामध्ये कौटुंबिक,राजकीय,प्रेमकथा,धार्मिक, अशा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती होत होती. त्यामधून एक चांगला संदेश मिळत होता. सध्याचे चित्रपट हे व्यावसायिक प्रकारचे चित्रपट झाले आहेत. सध्याच्या काही चित्रपटातील कथांमधून खूप काही शिकता येणार नाही.

प्रश्न: चित्रपट सृष्टीत भाग्य आजमावणाऱ्या नौख्या तरुणांना काय संदेश देणार?

चित्रपट सृष्टीत बरेच नवखे तरुण,तरुणी आपले भाग्य आजमवण्यासाठी संघर्ष करतात. परंतु चांगली संधी मिळेल या भूलथापाला बळीही पडतात. नवख्या कलाकारांनी चांगले काम मिळेल यावर अवलंबून राहू नये. शिक्षण घेऊन दुसरे काही करता येईल या तयारीने आपले भाग्य आजमावे. जर कलावंत म्हणून संधी मिळाली नाही तर इतर क्षेत्रात शिक्षणामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

प्रश्न: खैरलांची प्रकरणावरील चित्रपटात भूमिका साकारल्यानंतरचा अनुभव काय होता?

खैरलांची प्रकरणावरील चित्रपटात काम करत असतांना मला जो अनुभव आला तो अनुभव वेगळाच होता. समाजाच्या लोकांशी कशाप्रकारे व्यवहार होत होता ती भूमिका साकारतांना मला कळाले. मला या चित्रपटाबद्दल काही धमक्या आल्या नाही परंतु दिग्दर्शकावर दबाव आणण्यात आला होता. मला चांगला अनुभव आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments