नांदेड – नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली होती. दुपारी ४ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे धाबे दणाणले होते. गुरुवारी मतमोजणी होणार आहे. महापालिकेवर काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व राहते की सत्ता हातातून जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड महापालिकेसाठी ६० टक्के मतदान
RELATED ARTICLES