नांदेड – नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान सुरू झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले. मतदार बाहेर न पडल्याने सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले. मतदानाची वेळ संपेपर्यंत किती मतदान होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. गुरुवारी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी २,५०० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या आहेत. १३७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. विविध पक्षांचे ४२३ तर १५५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात पहिल्यांदा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात (व्हीव्हीपॅट) मशीनचा वापर होणार आहे.
नांदेड महापालिकेसाठी ४ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान
RELATED ARTICLES