Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रनांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’

नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’

नांदेड:  नांदेड महापालिकेत ८१ पैकी काँग्रेसने ५२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवला. १४ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाने तीन जागा जिंकल्या असून,शिवसेना,एमआयएमचा सुपडा साफ झाला आहे. मागच्या वेळी एमआयएमचे अकरा नगरसेवक निवडणूक आले होते. यंदा त्यांना खाताही खोलता आला नाही. महापालिकेची आज मतमोजणी सध्या सुरु आहे.

नांदेड महापालिकेसाठी काल ६० टक्के मतदान झालं होत. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी मात्र भाजपनं काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखून ठेवतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं होत. यंदाच्या निवडणूकीत भाजपाने खालच्या पातळीवर प्रचार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांवर थेट वैयक्तिक आरोप केले होते. शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. दोन्ही पक्ष राज्यात केंद्रात एकत्र सत्तेत असून दिशाभूल करत असल्याचे मतदारांच्या लक्षात आले होते. यामुळे दोन्ही पक्षाला मतदारांनी नाकारले असल्याचे दिसून येते.

नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे, नांदेडने पक्षावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून एवढा विजय मिळवून दिला त्याबद्दल अशोक चव्हाण यांनी आभारही मानले. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. जिंकण्यासाठी बाहेरचे लोकं आणले. भाजपला त्याचाच फटका बसला. मूळ गणित चुकल्यामुळे भाजपचा पराभव झाला. असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी सांगितले की,पूर्वी आमचे ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सात नगरसेवक सहा महिण्यापूर्वी कांग्रेसमध्ये गेले होते. आमचा पराभव का झाला होता याचा अभ्यास करु.

 ( मतमोजणी सुरु आहे. पुढेच वृत्त लवकरच)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments