Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

अहमदनगर : शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार  २५२५ रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.

दरम्यान, हे आंदोलन शमविण्यासाठी आणि ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी साखर आयुक्तांसोबत बैठक सुरू होती. दुपारी चार वाजलेपासून सुरू झालेल्या या बैठकीत अखेर तोडगा निघाला. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक पार पडली. उसाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हे आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी वेळीच पावले टाकण्यात आली. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. शेतकऱ्यांसोबत पार पडलेल्या या बैठकीला आयुक्तांसह पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकरीही उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments