Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाइंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली

इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली

गुजरातमधील जामनगर इथे पोलिसांकडूनच जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला मारहाण झाली. रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर भररस्त्यात मारहाण केली.मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे.महत्त्वाचं म्हणजे मारहाणीचा हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळच घडला. या घटनेचा  व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला रीवाबा आणि पोलीसामध्ये वाद सुरु असल्याचं दिसतं. ज्यावेळी रीवाबाच्या कारची पोलिसाच्या गाडीला धडक बसली, त्यावेळी पोलिस गणवेशात नव्हता. मात्र या अपघातात रीवाबाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पोलीस मुख्यालयाजवळच घडल्याने, हे प्रकरण तातडीने पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं. 

दरम्यान, रीवाबाचा पती रवींद्र जाडेजा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. जाडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. सध्या जाडेजा मुंबईत आहे.पोलीस मुख्यालयाजवळील घटनेचा व्हिडीओ. याप्रकरणी कॉन्स्टेबल संजय अहिरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments