skip to content
Friday, May 24, 2024
Homeक्रीडामी रोबोट नाही, मलाही आरामाची गरज-विराट

मी रोबोट नाही, मलाही आरामाची गरज-विराट

महत्वाचे…
१.माणूस म्हणून विचार केला ही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणे अशक्य २.
२. मी सुद्धा एक माणूसच आहे, रोबोट नाही ३. आम्ही प्रत्येक मालिका जिंकण्यास इच्छुक


कोलकाता – सातत्याने क्रिकेट खेळण्याच्या प्रश्नावर भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत व्यक्त केले आहे. माणूस म्हणून विचार केला तर कुठल्याही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणे शक्य नाही. मी सुद्धा एक माणूसच आहे, रोबोट नाही. मलाही आरामाची गरज असते,” असे विराटने म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आल्यानंतर खेळाडूंच्या सातत्याने क्रिकेट खेळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यासामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराटने हार्दिक पांड्याला संघातून विश्रांती देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. विराट म्हणाला, “भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू वर्षाला सरासरी ४० सामने खेळतो. ज्याच्यावर अतिरिक्त दबाव असतो, त्याला विश्रांतीचीही नितांत गरज असते. मलाही विश्रांतीची गरज आहे.”
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला संघातून विश्रांती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अखेर हार्दिक पांड्याने आपणच विश्रांतीची मागणी केली होती, असे सांगित सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे. श्रीलंकेविरुद्ध ९-० ने विजय मिळवल्याचा या मालिकेवर कुठलाही प्रभाव पडणार नसून कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यावर संघाचे लक्ष केंद्रित राहील, अशी प्रतिक्रिया भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली आहे.
भारताने श्रीलंका दौ-यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व सामने जिंकले. आता भारतीय संघ तीन कसोटी, तीन वन-डे व तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवित आहे.
ईडन गार्डन्सवर सराव सत्रानंतर बोलताना रहाणे म्हणाला,‘गेल्या मालिकेच्या तुलनेत ही मालिका एकदम वेगळी आहे. आमचा श्रीलंका दौरा संस्मरणीय ठरला असला तरी आम्ही श्रीलंका संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. सध्यातरी आम्हाला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे. आम्ही प्रत्येक मालिका जिंकण्यास इच्छुक आहोत. आम्हाला येथील परिस्थितीबाबत चांगली माहिती आहे.’
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौºयावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments