Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाविराट अनुष्काच्या रिसेप्शनकडे सर्वांच्या नजरा?

विराट अनुष्काच्या रिसेप्शनकडे सर्वांच्या नजरा?

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडी अनुष्का शर्मा – विराट कोहली ११ डिसेंबरला टस्कनी येथे विवाहबंधनात अडकले. भारतात परतल्यानंतर २१ तारखेला या नवदाम्पत्याने नवी दिल्ली येथे त्यांचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही उपस्थिती होती. दिल्लीतील ताज डिप्लॉमॅटिक एन्क्लेव्ह हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शनचा खर्च ५० लाख रुपये इतका असल्याची चर्चा आहे. येत्या २६ डिसेंबरला मुंबईमध्ये विरुष्काने आणखी एक रिसेप्शन ठेवले असून, यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मंडळी उपस्थित राहतील.

सुत्रांच्या माहितीनुसार, लोअर परेल येथील ४० मजली होटेल सेंट रेजिसच्या ‘एस्टर बॉलरूम’मध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. जवळपास ६५ हजार स्क्वेअर फूटचा ‘एस्टर बॉलरूम’ हा क्रिस्टल झुमरांनी सजलेला शानदार बॅक्वेट हॉल आहे. हे ठिकाण २६ डिसेंबरला पूर्ण दिवसासाठी बूक करण्यात आले आहे. त्या दिवशी सकाळपासून बॅक्वेट हॉलच्या सजावटीला सुरुवात होईल आणि रात्री ८ नंतर रिसेप्शन सुरु होईल. हे रिसेप्शन पहाटे ३ पर्यंत असणार आहे.

विराट – अनुष्काने मुंबईतील रिसेप्शनसाठी जवळपास ६०० पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. यात बी-टाउन सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सचा सर्वाधिक समावेश आहे. पाहुण्यांसाठी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांपासून कॉकटेल्स आणि लिकरची सोय करण्यात आल्याचेही कळते. पण दिल्लीतील रिसेप्शनच्या तुलनेत या मुंबईतील रिसेप्शनचा खर्च कमी असल्याचे कळते. या रिसेप्शनमध्ये ३० लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, यात कॉकटेल्स आणि ड्रिंक्सचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments