Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडामहायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर श्रृंगारे यांच्या विजयी संकल्प रथाचा शुभारभ माकणी...

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर श्रृंगारे यांच्या विजयी संकल्प रथाचा शुभारभ माकणी ( थोर) येथून मा.खा रुपाताई पाटील निंलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला

60 वर्षात न झालेली कामे मागच्या पाच वर्षात झाली – रूपाताई पाटील
विकास कामांवर मते मागणार – अरविंद पाटील निलंगेकर
मतदारसंघाचा चौकीदार म्हणून काम करणार – सुधाकर शृंगारे
माकणी थोर येथून विजय संकल्प रथाचा शुभारंभ

निलंग : मागची 60 वर्ष सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामांकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतः ची झोळी भरली. यामुळे सामान्य जनतेचा विकासच झाला नाही. याउलट केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने 60 वर्षात होवु न शकलेली कामे अवघ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण केल्याची माहिती माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी दिली.
भाजपाच्या वतीने मतदारसंघात प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या विजय संकल्प रथाचा शुभारंभ रूपाताई पाटील यांच्या हस्ते जागृत देवस्थान माकणी थोर येथील हनुमान मंदिरात करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना रूपाताई पाटील बोलत होत्या. यावेळी उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, लातुरचे महपौर सुरेश पवार, जि प सदस्य प्रशांत पाटील,पंचायत समितीचे सभापती अजित माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात रूपाताई पाटील म्हणाल्या की, आम्ही जनतेला खोटे बोलून मते मागत नाही तर मागच्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि जिल्ह्यात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या विकास कामांवर मते मागत आहोत. 60 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते या सरकारने अवघ्या पाच वर्षात केले. आम्ही कोणत्याही पक्षाचा द्वेष करत नाही, टीका करत नाही. मोदी सरकारने विविध योजना राबवल्या. जनधनच्या माध्यमातून प्रत्येक व्यकीचे बँकेत खाते काढून योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावर टाकण्यात आले. राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली. लातूर जिल्ह्यातही महामार्गांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनाही अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. पालकमंत्र्यांच्या विकास कामांचा धडाका पाहता जनतेने भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही रूपाताई पाटील यांनी केले.
मतदारसंघाचा चौकीदार म्हणून काम करणार – सुधाकर शृंगारे
यावेळी बोलताना उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार मानले. देशाचा आणि मतदारसंघाचा चौकीदार म्हणून आपण काम करणार आहोत. जनतेने आपले मत देऊन मला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विकास कामांवर मते मागणार – अरविंद पाटील निलंगेकर
अरविंद पाटील म्हणाले की, विरोधक टीका करताहेत. द्वेषाचे राजकारण केले जात आहे. परंतु आपण त्या मार्गाला जायचे नाही. आपण विकास कामांवर मते मागणार आहोत. जनता आपल्या पाठीशी आहे. ज्यांना साधे शौचालय बांधता आले नाही ते केवळ थापा मारत आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्हाला मागच्या पाच वर्षांचा हिशोब मागितला जात आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाचा हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात शेतकरी, गोरगरीब, महिलांसाठी ज्या योजना राबवल्या त्याचा लेखाजोखा सादर केला तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल. आम्ही दिलेला लाभ तुमच्या कार्यकाळापेक्षा अधिक आहे. हे खोटे असेल तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. अन्यथा तुम्ही राजकारण सोडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी 56 पक्ष एकत्र आले आहेत. आपल्या जिल्ह्यातही 56 जण पालकमंत्र्यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. त्यांचे मनसुबे धुळीस मिळवून सुधाकर शृंगारे यांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास,जि.प.सदस्य श्री प्रशात पाटील, पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्‍वर वाकडे, चेअरमन दगडू सोळुंके, जि. प. सदस्या भारतबाई सोळुंके, अरुणा बरमदे, संतोष वाघमारे, धोंडीराम बिराजदार, पृथवीराज शिवशिवे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प स सदस्य वामन भालके, हरिभाऊ वाळके, कालिदास पाटील, बालाजी सूर्यवंशी, भाऊराव येळीकर,श्री रामलिंग शेरे व ज्ञानेश्वर चेवले आदींसह पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments