Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडालातूर मतदारसंघात रेल्वेचे जाळे निर्माण करणार - पालकमंत्री श्री संभाजीराव पाटील निंलगेकर

लातूर मतदारसंघात रेल्वेचे जाळे निर्माण करणार – पालकमंत्री श्री संभाजीराव पाटील निंलगेकर

देवणी : लातूर लोकसभा मतदारसंघ हा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे . या भागात उद्योग
वाढविण्यासाठी रेल्वेचे जाळे निर्माण करू ,असे आश्वासन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले .
लातूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी जवळगा व वलांडी येथे आयोजित अटल बुथ संमेलनात पालकमंत्री बोलत होते . व्यासपीठावर उमेदवार शृंगारे ,युवा नेते अरविंद पाटील , जि प उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके ,सदस्य प्रशांत पाटील ,चंदन शिवशिवे ,सरपंच रमेश वाघ ,काशिनाथ गरीबे ,वामनराव पाटील ,चंद्रशेखर महाजन ,सरपंच सौदागर ,नगरसेवक मंगेश बिराजदार यांची उपस्थिती होती .

पालकमंत्री म्हणाले की आज राज्यात महामार्गांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे . रस्ते झाल्याशिवाय विकास होत नाही . आता रस्ते होत असल्याने भविष्यात उद्योग वाढणार आहेत . आणखी विकास करण्यासाठी लातूर मतदारसंघात रेल्वेचे जाळे तयार करायचे आहे ,असे पालकमंत्री म्हणाले . या निवडणुकीत देशावर प्रेम करणारी व्यक्ती भाजपालाच मतदान करणार आहे . लातुरची जागा निवडून येणारच आहे . आज लातूर मताधिक्याच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर आहे . पण पहिल्या तीन क्रमांकात येण्यासाठी आपला प्रयत्न आहे . राज्यात महिलांचे सर्वाधिक मतदान करणारा मतदारसंघ म्हणून लातुरची ओळख निर्माण करावयाची आहे . यासाठी प्रत्येक बुथवर पहिली ५० मते महिलांची व्हावीत यासाठी बुथ प्रमुख व कार्यकर्त्यानी प्रयत्न करावेत. मतदार हेच आपले सर्वस्व आहेत हे समजुन कामाला लागा ,असे आवाहन करतानाच लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी भाजपालाच मतदान करण्याचे आवाहन निलंगेकर यांनी केले .

यावेळी बोलताना उमेदवार सुधाकर शृंगारे म्हणाले की ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या महामार्गावरून जात आहे . विकासाची हीच गती कायम राखण्यासाठी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करावयाचे आहे . मोदी यांच्या सोबत चौकीदार म्हणून काम करण्यासाठी मी तयार आहे . मला संधी द्या . लातूर मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करणे गरजेचे आहे ते करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . ऱेल्वे सोबतच जिल्ह्यात उद्योग वाढावे यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शृंगारे यांनी दिले .
यावेळी भगवानराव पाटील तळेगावकर ,रामचंद्र तिरुके यानीही मार्गदर्शन केले . या संमेलनास जवळगा व वलांडी गटातील बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments