Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाभाजपा उमेदवार शृंगारेंना नाभिक संघटनेचा पाठिंबा

भाजपा उमेदवार शृंगारेंना नाभिक संघटनेचा पाठिंबा

लातूर :लोकसभा निवडणूकी साठी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना लातूर जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला . भाजपा हाच आज देश चालविण्यास सक्षम पक्ष असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना विजयी करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला .

नाभिक संघटनेच्या वतीने सुधाकर शृंगारे यांचा सत्कार करून पाठिंब्याचे पत्र देण्यात आले .लातूर जिल्ह्यात नाभिकांची २३२८ दुकाने आहेत . शहरात हीच संख्या ५१८ एवढी आहे या सर्व दुकानदारानी भाजपा उमेदवाराना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे देशाला विकासाच्या दिशेला नेणारी आहेत . देशाला आज मोदी यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे . देशाचा विकास करायचा असेल तर मोदी आणि भाजपा सरकारची गरज आहे .

भाजपा सरकारने सामान्य जनतेच्या हिताची धोरणे राबवली आहेत या सरकारला पुन्हा संधी मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला असल्याचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे व जगन्नाथ गवळी यांच्यासह समाजातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी सांगितले . यावेळी उपमहापौर देविदास काळे ,नगरसेवक अजय कोकाटे ,गोरोबा गाडेकर ॲड चेवले ,रामलिंग शेरे यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments