सलमान-शाहरुख याचे मित्र, अशी LIFE जगतो दुबईचा हा 15 वर्षीय सिलेब्रिटी…

वयाच्या 15 व्या वर्षी बरीच मुले कार्टून आणि व्हिडिओ गेम खेळण्यात मशगूल असतात. मात्र, दुबईचा हा टीनेजर आलीशान आयुष्याच्या बाबतीत भल्या-भल्यांना लाजवतो. याच्या मित्रांच्या यादीत पप्या किंवा पिंट्या नाहीत, तर सलमान खान आणि शाहरुख खान आहेत. राशेद बेलहासा असे या मुलाचे नाव असून तो दुबईतील नामवंत उद्योजक सैफ अहमद बेलहासा यांचा मुलगा आहे. केवळ शूजबद्दल बोलावयाचे झाल्यास त्याच्याकडे 6.5 कोटी रुपयांचे शूज कलेक्शन आहे. प्रायव्हेट फार्म हाऊस, जेट आणि आलीशान कारच्या ताफ्याचा तो मालक आहे. दुबईला जाणारी कुठलाही भारतीय सिलेब्रिटी त्याची भेट घेतल्याशिवाय परत येत नाही.

दशकभरापासून भारतीय श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी टॉपवर,

नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी सलग दहाव्या वर्षी भारतीय श्रीमंतांच्या यादीत टॉपवर राहिले आहे. त्यांची एकूण संपत्ती 38 यूएस बिलियन डॉलर अर्थात जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी ती 1.5 लाख कोटी रुपये होती. फोर्ब्स नियतकालिकाने भारतातील 2017मधील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात विप्रोचे अजीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 19 बिलियन यूएस डॉलर (साधारण 1.2 कोटी रुपये) आहे.

भारतातील 10 श्रीमंत व्यक्ती
1 – मुकेश अंबानी
2 – अजीम प्रेमजी
3 – हिंदुजा ब्रदर्स
4 – लक्ष्मी मित्तल
5 – पलोनजी मिस्त्री
6 – गोदरेज फॅमिली
7 – शिव नादर
8 – कुमार बिर्ला
9 – दिलीप संघवी
10 – गौतम अदानी

विकास वेडा झालाय ही भाजपामधूनच आलेली स्लोगन… राज ठाकरे

विकास वेडा झालाय ही भाजपामधूनच आलेली स्लोगनआहे. मोदी बोलायला लागले तर टिव्ही बंद करावा असे वाटते असे लोक बोलत आहेत. अशी खिल्ली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडवली. एलफिन्सटन्स चेंगराचेंगरी प्रकरणी गुरुवारी मोर्चाला ठाकरे यांनी संबोधीत केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, तत्कालीन गर्व्हेनर यांनी सांगितले अजून मंदी वाढणार असे उर्जीत पटेल यांनी सांगितले. याचा अर्थ नोकऱ्या जाणार. दोन चार लोक चालवणार सरकार. सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला. प्रभूंना काढल आणि गोयल यांना आणला. कोणासाठी आहे ही बुलेट ट्रेन. गुजरातचा मुंबईवरा डोळा आहे हे आम्हाला कळत नाही का? मूठभर गुजरातीसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार का? नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असतांना त्यांचा भाषण फिरत आहेत. मोदी म्हणाले होते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बुलेट ट्रेन सुरु करा सांगितले होते. त्यावेळी मनमोहनसिंगने विरोध केला.त्यावेळी मोदी म्हणाले होते हम दिखा तो सकते. एवढा खोटा बोलणारा पंतप्रधान मी कधी बघितला नाही. असा आरोप टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरेंचा इशारा: पंधरा दिवसाच्या आत स्टेशनजवळील फेरीवाले उठवा, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते सोळाव्या दिवशी उठवतील.

राज ठाकरेंचा इशारा: पंधरा दिवसाच्या आत स्टेशनजवळील फेरीवाले उठवा, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते सोळाव्या दिवशी उठवतील.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी पोहचले. राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात. मनसैनिकांची मोठी गर्दी.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी पोहचले. राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात. मनसैनिकांची मोठी गर्दी.

पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना समर्थन देणार; फुटीरतावाद्यांना पाठिंबा

इस्लामाबाद -भारतीय सैन्य कमांडर्सच्या ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ६ दिवसीय संमेलनापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषा, काश्मीर आणि देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यात भारताच्या सीमेवर शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरदेखील चर्चा झाली. पाकिस्तानच्या सैन्यातील मुख्य कमांडर्सची मंगळवारी बैठक झाली. ही बैठक ७ तास सुरू होती. काश्मीरविषयी निर्णय स्वातंत्र्य असावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे अशा रीतीने काश्मीर फुटीरतावाद्यांविषयी पाकने चर्चा केली. त्यांचा त्यासाठी लढा सुरू आहे. त्यांना समर्थन देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या लष्कराने घेतला आहे. काश्मीरमधील अतिरेक्यांना साहाय्य करण्याचे धोरण उघडपणे स्वीकारण्यात आले आहे. ‘डॉन’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, राजकीय आणि कुटनीतीच्या स्तरावर पाकिस्तानी सैन्य स्वतंत्र काश्मीरवाद्यांना समर्थन देणार आहे. स्पेशल कॉप्स कमांडर्स कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेतल्याचे वृत्त डॉनने प्रकाशित केले.

चीनच्या सीमेवर डोकलाम वाद, चीन आणि पाकिस्तान सीमेसहित राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यावर भारताच्या उच्च सैन्याधिकाऱ्यांची ६ दिवसीय बैठक ९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. त्याच वेळी पाक सैन्याने आपले धोरण स्पष्ट केले.

सैन्याचे अधिकृत वक्तव्य नाही ही बैठक ७ तास सुरू होती. सैन्याने माध्यमांना याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नाही. सैन्याची जनसंपर्क यंत्रणा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने कोणतेही अधिकृत वक्तव्य न देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बैठकीत जनरल बाजवा यांच्या काबूल दौऱ्याविषयी चर्चा झाली. त्यांनी अफगाणिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांची या दौऱ्यादरम्यान भेट घेतली.

रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

स्वीडन : वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील नोबेलनंतर आता रसायनशास्त्रातील नोबेलही जाहीर झाला आहे. स्वीस संशोधक जॅक्स डबॉच आणि अमेरिकन संशोधक जोचिम फ्रँक, रिचर्ड हँडरसन यांना यंदा रसायनशास्त्रातील नोबेलने गौरवण्यात आले आहे.

जैव रेणूंच्या इमेजिंगमध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कॉपी विकसित करण्यात जॅक्स डबॉच, जोचिम फ्रँक आणि रिचर्ड हँडरसन यांचा अमूल्य योगदान आहे.

जॅक्स डबॉच, जोचिम फ्रँक आणि रिचर्ड हँडरसन यांच्या संशोधनामुळे जीवरसायनशास्त्रात नव्या युगाला प्रारंभ झाला, असे रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सने गौरव पत्रकात म्हटलंय.

5 ऑक्टोबरला साहित्यातील नोबेल, दर 6 ऑक्टोबरला शांततेचा नोबल जाहीर केला जाणार आहे. शांततेचा नोबेलने कुणाचा गौरव होतो, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

महिला पंच पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात

महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडतात. क्रिकेटच्या मैदानात पुरुषांप्रमाणे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात महिला खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केल्याचे आपण नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषकात पाहिले. पण आता ऑन फिल्ड अंपायर म्हणून देखील महिला मैदानात उतरणार आहेत. रविवारी न्यू दक्षिण वेल्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुरुष गटातील सामन्यात कॅरी पोलोस्का पंच म्हणून मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात पंचाची कामगिरी करणारी ती पहिली महिला असेल. या सामन्यातील कामगिरीपूर्वी कॅरी म्हणाल्या की, मी एकदाही क्रिकेट खेळलेले नाही. मात्र क्रिकेट खेळाविषयी मला चांगली जाण आहे. पंच होण्यासाठीच्या पात्रता परीक्षेत अनेकदा अपयश आले. मात्र मी प्रयत्न सोडले नाहीत.

याशिवाय आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने महिलांच्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीतील सामन्यांसाठी चार महिला पंचाच्या नावाची घोषणा केली. कॅरी पोलोस्कासह न्यूझिलंडची अनुभवी खेळाडू कॅथलिन क्रॉस, इंग्लंडची रेडफर्ड आणि वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विलियम्स यांचा समावेश आहे. महिला विश्वचषकाच्या पात्रता फेरीत बांगलादेश, चीन, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, थायलंड आणि झिम्बाब्वे या देशांतील संघ पात्रता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यातील अव्वल दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. पात्रता फेरीतील सामने २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान थायलंडमध्ये रंगणार आहेत. या सामन्यांसाठी चार महिला पंचांची आयसीसीने नियुक्ती केली. याशिवाय दोन पुरुष पंचांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

शक्ती कपूर तृतीयपंथीयांच्या रुपात

शक्ती कपूर यांनी विविध चित्रपटांमध्ये आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांपासून ते अगदी विनोदी भूमिकांपर्यंत प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांसमोर जीवंत करणारे शक्ती कपूर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांची ही भूमिका जितकी वेगळी आहे तितकीच आव्हानात्मकही आहे. आगामी ‘रक्तधार’ या चित्रपटातून ते तृतीतपंथीयाची भूमिका साकारत असून, या भूमिकेद्वारे एका महत्त्वाच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

तृतीयपंथीयाची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारण्याच्या अनुभवाविषयी सांगताना शक्ती यांनी एक इच्छाही व्यक्त केली. तृतीयपंथी समुदायाला एक दिवस समान वागणूक मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. समाजातील एक अविभाज्य घटक म्हणून तृतीयपंथीयांकडे पाहिलं जातं पण, बऱ्याच ठिकाणी त्यांना समान हक्कांपासून वंचित राहावं लागतं. त्यांना इतरांप्रमाणेच सर्व हक्क मिळावेत यासाठी बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातूनही या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘रक्तधार’सुद्धा त्याच यादीतील एक चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही.

आपल्या या आगामी चित्रपटाविषयीची माहिती देत शक्ती कपूर म्हणाले, “बऱ्याच लहान गोष्टी मोठे आणि महत्त्वाचे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. ‘रक्तधार’ हे त्याचच उदाहरण आहे. हा बिग बजेट चित्रपट नसला तरीही त्याद्वारे जो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याचा प्रेक्षक मोठ्या मनाने स्वीकार करतील आणि तृतीयपंथीयांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनातही बदल करतील अशी मला आशा आहे.”

रितेश अमेयवर का रागावला?

रीतेश देशमुखची निर्मिती, अमेय वाघची मुख्य भूमिका आणि चित्रपटाचं अनोखं प्रमोशन या सर्व कारणांमुळे ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. आधी मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले ‘फ’च्या बाराखडीचे व्हिडिओ आणि आता अमेयने फेसबुकवर पोस्ट केलेला एक फोटो नेटीझन्सचं लक्ष वेधत आहेत. हा फोटो पाहून रितेश अमेयवर का चिडला आहे असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

अमेयने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये चित्रपटाचा निर्माता रितेश देशमुख दिसत आहे. अमेयच्या एका बाजूला मोबाईलमध्ये रितेशचा फोटो पाहायला मिळत आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूला स्वत: रितेश उभा आहे. रितेश अमेयकडे रागाने बघत आहे. मोबाईलमधील फोटो नीट पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की त्यामधील रितेशचा लूक आणि अमेयचा लूक एकसारखाच आहे. दोघांची हेअरस्टाइलसुद्धा सारखीच आहे. रितेशचा हा लूक त्याने ‘फास्टर फेणे’साठी कॉपी केल्याचं दिसून येत आहे. आता रितेश त्याच्यावर नेमका कशामुळे रागवला आहे याचं कारण तो स्वत:च सांगू शकेल.