आघाडीची अभिनेत्री साकारणार कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका

सलमान खान स्टारर ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाला मिळालेलं अपयश पचवत दिग्दर्शक कबीर खान आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. १९८३ मध्ये पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित चित्रपट तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग भारतीय संघाचं तत्कालीन नेतृत्त्व करणाऱ्या कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. आता या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी बी- टाऊनमधील एका अभिनेत्रीचं नाव पुढे येत आहे.

रणवीरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी कबीरने त्याच्या टीमचाच एक भाग असलेल्या कतरिना कैफच्या नावाला प्राधान्य दिलं आहे. कबीरसोबत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे कतरिनासुद्धा या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्सुक असल्याचं वृत्त ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलं आहे. कपिल देव यांच्या पत्नीच्या म्हणजेच रोमी देव यांच्या भूमिकेसाठी तिच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

कबीर खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तिने याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, या चित्रपटासाठी दोन अभिनेत्रींची निवड करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात असून, त्यात एका नव्या चेहऱ्यालाही संधी मिळू शकण्याची चिन्हं आहेत. कतरिना आणि रणवीर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले तर प्रेक्षकांना एका नव्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येईल.

यासाठी वरुण- आलिया आले एकत्र

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ पासूनच हिट ठरली होती. या सिनेमानंतर दोघांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन सिनेमांमध्ये काम केले. हे तीनही सिनेमे सुपर हिट ठरले होते. पण या तीन सिनेमांनंतर दोघांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रेक्षकांना नवी जोडी पाहता यावी म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण आता त्यांना आपलाच नियम तोडावा लागला. दोघं पुन्हा एकदा चित्रीकरणासाठी एकत्र आले आहेत. पण हे कोणत्याही सिनेमाचे चित्रीकरण नसून एका जाहिरातीसाठी हे एकत्र आले आहेत.

अनुष्काही सोनमच्याच वाटेवर

चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर फार कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा यशस्वी ठरली. अभिनयानंतर तिने चित्रपट निर्मितीतंही आपलं नशीब आजमावलं. नवनवीन गोष्टी करण्याची आवड आणि उत्साह असणाऱ्या अनुष्काने नुकतंच आणखी एका क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिची बहीण रिया कपूर यांनी मिळून एक फॅशन ब्रँड लाँच केला होता. त्यामुळे अनुष्कासुद्धा आता सोनमच्याच पावलांवर पाऊल टाकत अनुष्काने स्वत:चं ‘नुष’ हे क्लोथिंग ब्रँड आणलंय. मंगळवारी या ब्रँडचा उद्घाटन सोहळा पार पडला. यापूर्वी

‘हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी या ब्रँडसाठी काम करत आहे. एखादा नवीन प्रकल्प सुरू करताना मनात एक दडपण असतंच की, ते यशस्वी होईल की नाही. माझ्याही मनात थोडीफार भीती आहे. पण ही कल्पना मी सत्यात उतरवली याचा मला आनंदसुद्धा आहे,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.

गुजरात दंगल : मोदींना क्लीनचीट देणाऱ्या निर्णायाविरोधात दाखल याचिका HC ने फेटाळली

अहमदाबाद – गोध्रा कांडानंतर भडकलेल्या गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीनचीट देण्यात आली होती. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका दंगलीत मारलेल्या गेलेले काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जकिया जाफरी यांनी दाखल केली होती.

रिव्ह्यू पिटिशन दाखल करणाऱ्यांमध्ये तिस्ता सेटलवाडही कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हा निर्णय विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासावर आधारीत होता. यामध्ये मोदींसह 56 आरोपींना क्लीनचीट देण्यात आली होती. याचिकेत आरोप करण्यात आला होता की या दंगलीमागे मोठे गुन्हेगारी षडयंत्र रचण्यात आले होते. रिव्ह्यू पिटीशन दाखल करणाऱ्यांमध्ये जाफरी यांच्या शिवाय सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची एनजीओ सिटीजन फॉर जस्टिस अँड पीस यांचाही समावेश होता. याचिकेत काय मागणी होती? मोदी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि नोकरशहा असे एकूण 59 जण या गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप होता. या सर्वांना आरोपी करण्यात आले होते. याचिकेत मागणी करण्यात आली होती की दंगलीचा हायकोर्टाने नव्याने तपास करण्याचे आदेश द्यावे.

अधिकाऱ्याच्या खुर्चीत राधे माँ, पोलिस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट

नवी दिल्ली : भोंदू बाबांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या राधे माँला दिल्ली पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं समोर आलं आहे. स्वयंघोषित धर्मगुरुदिल्लीच्या विवेक विहार पोलिस स्टेशनमध्ये एसएचओच्या खुर्चीवर विराजमान झाल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

नवरात्र उत्सवाच्या काळात राधे माँ दिल्लीच्या विवेक विहार पोलिस ठाण्यात आली होती. यावेळी एसएचओ संजय शर्मा यांनी तिला चक्क आपली खुर्ची बसायला दिली. इतकंच नव्हे तर त्यांनी राधे माँचा आशीर्वादही घेतला.

राधे माँने प्रसाद म्हणून संजय शर्मा यांच्या गळ्यात ओढणीही टाकली. त्यांच्या टेबलवर फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या आहेत. तर पोलिस स्टेशनमधील काही कर्मचारीही भक्तांच्या मुद्रेत दिसत आहेत.

ही सगळी दृश्यं व्हायरल झाल्यानंतर आता स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांना कसरत करावी लागत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस उपायुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

राधे माँवर हुंड्यासाठी छळ, लैंगिक छळ आणि धमकी देणं असे अनेक गंभीर आरोप आहेत.

राज ठाकरे मेट्रो सिनेमागृहाकडे रवाना, कार्यकर्त्यांसह नागरिकांची तुफान गर्दी

ई- रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी आता थोड्याच वेळात रेल्वे मुख्यालय चर्चगेटवर राज ठाकरे धडक मोर्चा काढत आहेत. राज ठाकरेंच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही. मात्र मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे. राज ठाकरे मेट्रो सिनेमागृहाकडे रवाना झाले आहेत. तेथे आधीच कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांची या मोर्चाला मूकसंमती आहे, मात्र मनसेच्या वतीने कायदा व सुव्यवस्था बिघडवली जाणार नाही या अटींवर या मोर्चाला संमती दिल्याचे सांगितले. राज ठाकरे रेल्वे ट्रॅकवर उभे राहून भाषण करणार आहेत.

राज ठाकरेंनी आजच्या मोर्चासाठी मोठी ताकद लावली असून ते मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे आदी भागातून पक्षाच्या ताकदीचा उपयोग करून घेतल्याचे दिसत आहे. आज सकाळपासून नाशिक-पुण्याहून अनेक मनसैनिक मुंबईच्या दिशेने धावत आहेत. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून सुरु होईल तो चर्चगेट रेल्वे स्टेशनवर थांबेल. या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द राज ठाकरे करतील.

किड्या- मुंग्यांसारखं मरणार की आपल्या न्याय हक्कासाठी रेल्वे मुख्यालयावर धडक देणार असे भावनिक आवाहन करत राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी व्हावे अशी हाक सोशल मिडियाद्वारे दिली होती. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. याशिवाय मुंबईतील मनसे पदाधिका-यांनी तीनही लाईनवर जाऊन रेल्वे गाड्यातील प्रवाशांना या मोर्चात सामील होण्याबाबत साद घातली होती.

मागील आठवड्यात 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वेच्या समस्यांबाबत आपला राग व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. सोबतच हा राग व्यक्त करण्यासाठी राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

हार्दिक पांड्याची कपिल देवशी तुलना नको – सौरव गांगुली

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटच्या मधल्या फळीत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. केदार जाधव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या अशा काही प्रमुख खेळाडूंची नावं या यादीत प्रामुख्याने घ्यावी लागतील. भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही काही दिवसांपूर्वी पांड्याचं कौतुक केलं होतं. अनेकांनी पांड्याची तुलना कपिल देव यांच्या खेळाशी केली. मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पांड्याची कपिल देवशी तुलना करणं थांबलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय. इंडिया टुडे या वृत्तसंस्थेशी बोलताना सौरवने आपली भूमिका मांडली आहे.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्या कोणत्याही मैदानात षटकार मारु शकतो – रवी शास्त्री

“हार्दिक पांड्या हा गुणी खेळाडू आहे, मात्र लगेचच त्याची कपिल देव यांच्याशी तुलना करणं घाईचं ठरु शकेल. कपिल देव हे सर्वार्थाने महान खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या पुढची १०-१५ वर्ष याच पद्धतीने खेळत राहिल्यास आपण त्याची कपिल देव यांच्याशी तुलना करु शकतो. सध्याच्या घडीला हार्दिकला त्याच्या खेळाची मजा घेऊ दे, आगामी काळात हार्दिक पांड्याने अधिक आक्रमक खेळ करण्याची अपेक्षा आहे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हार्दिकच्या खेळात सुधारणा होईल अशी मला आशा आहे.” हार्दिक पांड्याचं कौतुक करताना सौरव गांगुली बोलत होता.

विश्वचषक जिंकणं हेच आयुष्याचं ध्येय – राशिद खान

राशिद खान हे सध्याच्या घडीला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधलं एक महत्वाचं नाव. १९ वर्षीय राशिद खानने गेल्या काही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना आपली छाप पाडली आहे. याच कामगिरीच्या जोरावर राशिदची सर्वात आधी आयपीएल आणि त्यानंतर बिगबॅश लिग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी आयसीसीने अफगाणिस्तानला कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा दिला. यानंतर आगामी वर्षांसाठी राशिदने आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली. “मला अफगाणिस्तानात क्रिकेट विश्वचषक जिंकून आणायचा आहे. सध्यातरी माझ्या आयुष्याचं हेच एक ध्येय असल्याचं,” राशिद खान म्हणाला.

जागतिक क्रिकेटच्या पटलावर अफगाणिस्तानचा संघ जरी नवीन असला तरी त्यांच्यात अनेक मोठ्या संघाना हरवण्याची ताकद आहे. पुढील १० वर्षांमध्ये हा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या सहा जणांमध्ये येऊ शकतो. अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक अॅडम होलीओक यांनीही संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. “अफगाणिस्तानातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं वेड आहे. राशिद खानमुळे अनेक स्थानिक खेळाडू क्रिकेटकडे वळले आहेत. अनेकदा दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट यारख्या गोष्टींची पर्वा न करता लोकं राशिदचा सामना पहायला येतात. अफगाणिस्तानमध्ये होणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह असल्याचं,” होलीओक यांनी म्हणलंय.

आयपीएलनंतर राशिद खानची बीगबॅश लीगच्या अॅडीलेड स्टाईकर्स या संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज जेसन गिलेस्पीच्या हाताखाली राशिद सराव करणार आहे. त्यामुळे बीगबॅश लीग स्पर्धेत राशिद कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

त्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो…

नवी दिल्ली : विवाह बंधनात अडकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंची यादी वाढत आहे. युवराज सिंह, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्माचा यात समावेश आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीसह असे काही खेळाडू आहेत, जे अजून बॅचलर्स आहेत. या बॅचलर्स खेळाडूंपैकीच एक असलेला भुवनेश्वर कुमार आता चर्चेत आला आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीरपणे सांगितलं आहे. भुवीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसत आहे. भुवीने हा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.

गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात ‘कच्चा’

मुंबई : टीम इंडियाचा उपकर्णधार हिटमॅन रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानात त्याच्या दमदार खेळासाठी ओळखला जातो. वन डेत दोन द्विशतक ठोकणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. मैदानावरील त्याच्या कौशल्याबाबतीत कुणी काहीही शंका घेऊ शकणार नाही. मात्र गणितात तो जरासा कच्चा आहे.

ट्विटरवर 19 डिसेंबरला रोहित शर्माचे 8 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले. त्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओमध्ये, एका फळ्यावर 8 लिहिल्यानंतर त्यापुढे रोहितने सहा वेळा शून्य लिहिला. त्यामुळे हा आकडा 80 लाख झाला. मात्र 8000000 लिहिल्यानंतरही त्याने त्यापुढे M लिहिलं. म्हणजेच हा आकडा 80 लाख मिलियन झाला. त्यामुळे मैदानात गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात जरासा कच्चा निघाला.