शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल: शिवसेना

0

Sanjay Raut, Shiv Sena, Uddhav Thackerayमुंबई : शिवतीर्थावर शिवसेनेचाचं मुख्यमंत्री शपथ घेईल. आमच्याकडे 175 आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस चालणार नाही असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

राऊत यांनी आज भाजपावर निशाना साधला. महाराष्ट्रात जनता खोटारड्यांना धडा शिकवेलं. महाराष्ट्र मनानं आणि विचारानं मुक्त झालायं. सत्ता गेली तर आसपासचे माकडंही उड्या मारत नाही. भाजपकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. याचे पुरावे लवकरचं जाहीर करु. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देशाचे नेते आहेत. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे. असंही राऊत म्हणाले.

मुख्यंमंत्र्यांनी पलटली मारली असा आरोप राऊत यांनी केला. भाजपने रेसकोर्स बुक केल्याची कागदपत्रं आमच्याकडे आहेत. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांनी सरकार स्थापन करावं असा टोलाही राऊत यांनी लगावला. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पुढाकार का घेतला नाही. अमित शाह आणि शिवसेनेची मधुर संबंध असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेना दुहेरी भूमिका घेत नाही. शिवसेना कुणासमोरही झुकणार नाही. शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. हवं तेव्हा त्यांच मार्गदर्शन घेऊ. शिवतीर्थावर शिवसेनेचाचं मुख्यमंत्री शपथ घेईल असं दावा राऊत यांनी केला.

मनसेच्या संदीप देशपांडेंना 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

0

Sandeep Deshpande, MNSमुंबई : दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल लावलेले होते. या प्रकरणावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे मनपा अधिका-यांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी देशपांडे यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी देशपांडे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली होती. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना आज अटक करण्यात आली.

दादर-माहिम परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळी निमित्त लावलेल्या कंदिलांवर महापालिकेने कारवाई केली होती महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन माजी नगरसेवक देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यात वाद झाला होता. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

कंदिल हटवल्यावरून वाद…

दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल लावलेले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही होता. मनसे दरवर्षी हे कंदिल लावतात आणि तुळशीच्या लग्नानंतर ते काढलेही जातात. मात्र, यावेळी महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई केली. ते सर्व कंदिल काढले. यावेळी मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचंही ते म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही, असा मनसे स्टाईल इशाराही त्यांनी दिला होता.

कृषीमंत्री म्हणाले, कांदा खाल्ला नाही म्हणून मरत नाही

0

नाशिक : कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. कांदा खायचा असेल तर 50-60 रुपये किलो दराने घेऊन खा. विनाकारणची ओरड थांबवा, असं अजब सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

कांद्या दरावरुन ओरड करणाऱ्यांना जास्त दराने कांदा खाणं शक्य नसेल तर शेती घेऊन कांदा पिकवण्याचा सल्लाही दिला. ते परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निफाड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला.

परतीच्या पावसाने यंदा कांद्याला मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा 50-60 रुपये किलो दराने खावा लागला, तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी 3-4 महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. विनाकारण कांद्याची ओरड थांबवावी, अन्यथा ओरडणाऱ्यांनी शेती घ्यावी आणि ती करावी, असा सल्लाही खोत यांनी दिला.

काँग्रेसची भूमिका वेट अँड वॉचची : अशोक चव्हाण

0

मुंबई : भाजपाने शिवसेनेला फसवलं आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसंच आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपा आणि शिवसेनेचं सत्तास्थापनेचं काही ठरत नसल्याने काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्याबाबत चर्चेसाठीच अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेले आहेत. दरम्यान भाजपाने शिवसेनेला फसवलं आहे असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसंच आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे’ पिकाच्या नुकसानीची घेतली माहिती

0
Devendra fadnavis bjp shivsenaमुंबई : परतीच्या पावसानं शेतीचं नुकसानं केल. यामुळे शेतकरी हवालदिलं झाला आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी घेतला. शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली जाणार आहे.
राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली असून, त्यामध्ये ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यांचा समावेश आहे. नुकसान झालेल्या भागांचं तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक गावकर्‍यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचं अवलोकन करावं, असं सांगतानाच यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार राज्यात पुढीलप्रमाणे नुकसान झाले.
या विभांमध्ये झाले नुकसान…
कोकण ४६ तालुके, ९७ हजार हेक्टर,
नाशिक ५२ तालुके, १६ लाख हेक्टर,
पुणे ५१ तालुके, १.३६ लाख हेक्टरहून अधिक,
औरंगाबाद ७२ तालुके, २२ लाख हेक्टर,
अमरावती ५६ तालुके, १२ लाख हेक्टर,
नागपूर ४८ तालुके, ४० हजार हेक्टर

कांदिवलीत मेट्रो कामगार गर्डरखाली चिरडून ठार

0

मुंबई: मुंबईच्या दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोनसाठी ट्रेलरवरून नेण्यात येणारा गर्डर अंगावर पडल्यानं २५ वर्षीय कामगाराचा चिरडून मृत्यू झाला. ही दुर्घटना समता नगर पोलीस ठाण्याजवळ शुक्रवारी घडली. वाहनचालक अरमान अहमद असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मुंबई उपनगरात मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोन अ चे काम सुरू आहे. या कामासाठी ट्रेलरवरून १०० टन वजन असलेला गर्डर वाहून नेला जात होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे पहाटेच्या सुमारास समता नगर पोलीस ठाण्याजवळ ट्रेलरची जोडणी पीन पुलरमधून तुटल्यानं गर्डर मागील वाहनावर कोसळला. त्यात वाहनचालक अरमान अहमद याचा मृत्यू झाला. अरमान अहमद हा मे. जे. कुमार या कंपनीसाठी काम करत होता.

गर्डर ट्रेलरवर सुरक्षितपणे ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळं तो ट्रेलरवरून मागील वाहनावर पडला. यात मे. जे. कुमार या कंपनीसाठी काम करणाऱ्या चालकाचा मृत्यू झाला, अशी माहिती समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांनी माध्यमांना दिली.

गर्डर पडला त्यावेळी इतर दोघांनी त्या वाहनातून उड्या मारल्या. त्यामुळं ते बचावले, असंही पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी ट्रेलरच्या चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामुळे कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

बिगुल वाजलं : झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणुका!

0

jharkhand assembly election 2019
झारखंड : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं. ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.

निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

निवडणूक आयोग झारखंडबरोबरच दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम देखील घोषित करले, असे वाटत होते. मात्र आयोगाने केवळ झारखंडच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात येणार आहे.

झारखंडमध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासमोर या निवडणुकीस समोरे जाताना काही आव्हानं आहेत. ज्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीबरोबर जमावाकडून घडणाऱ्या हत्या व जमावाकडून होणार हिंसाचार यांचा समावेश आहे.

मुंबईकरांना पावसानं झोडपलं!

0

Rainमुंबई : आज अचानक पावसाने पुन्हा मुंबईत हजेरी लावली. दादर, परळपासून पुढे कुलाब्यापर्यंत अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. दक्षिण मुंबई व पश्चिम उपगरांमध्ये नागरिकांना शुक्रवारी पावसानं झो़डपलं.

पावसाची शक्यता स्कायमेटनं वर्तवली होती. सीएसटी, चर्चगेट, मरीन लाइन्स, जुहू परिसरात पावसाने हजेरी लावली. यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावतच आहे. राज्यात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकणात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी ऐन दिवाळीतही पावसाने थांबायचे नाव घेतले नाही. तत्पूर्वी काही दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरला पावसाने रात्री अचानक जोरदार बरसून मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील ‘क्यार’ चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवरही मुंबईत पावसाने हजेरी लावली होती.

दक्षिणेकडून उत्तरेकडे हे वादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, डहाणू या भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीतही पावसानं पाठ सोडली नसल्यामुळे नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण असून पावसापासून अजूनही सुटका झाली नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दक्षिण मुंबईमध्ये नागरिकांना पावसानं अवचित गाठलं. तर बांद्र्यामध्ये जोरदार पावसाची सर कोसळल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली.

‘महा’ हे वादळ 40 ते 60 किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आठ ते 12 फूट उंचीच्या लाटांची शक्यता आहे. गोवा कर्नाटक लगत समुद्रामध्ये ‘महा’ वादळामुळे पावसाचे वातावरण असून कोकणामध्ये मुसळधार त्यामुळे समुद्रतीरावरील नागरिकांनी सावध रहावं अशी सूचना स्कायमेटनं दिली आहे.

सरकारकडून शेतक-यांच्या मदतीकडे दुर्लक्ष : शरद पवार

0

नाशिक : राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या नुकसाग्रस्त पिकांची पाहाणी केली. शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी आरोप केला की, सरकारकडून काहीही सांगितलं जात नाही. नुकसानीचा अहवाल आम्ही सरकारला देऊ. सरकारने योग्य दखल घ्यावी.

शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

प्रशासनाने जिरायती आणि बागायती असा दुजाभाव न करता सरकसकट बागायती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचवलं.

तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार; भाजपचा सेनेला इशारा

0

मुंबई : सत्तावाटपाच्या गोंधळात शिवसेनेला भाजपनं अखेर निर्वाणीचा इशारा दिला. येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेला दिला आहे.

शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीसाठी आक्रमक आहे. तर, भाजपनं मुख्यमंत्रीच काय, महत्त्वाची खातीही देण्यास नकार दिल्यानं गाडं अडलं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये केवळ कलगीतुरा रंगला आहे. भाजप वर्चस्ववादाचं राजकारण करत असल्यानं शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं हा पेच अधिकच वाढला आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राच्या वाटाघाटीतून अंग काढून घेतलं असून राज्यातील नेत्यांनाच पेच सोडवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शिवसेना ऐकत नसल्यानं भाजपनं राष्ट्रपती राजवटीचं अखेरचं अस्त्र बाहेर काढलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असं म्हटलं आहे. यामुळे आणखीनच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.