Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशमाझी कंपनी यूझर्सचा डेटा सुरक्षित ठेवू शकली नाही: मार्क झुकेरबर्ग

माझी कंपनी यूझर्सचा डेटा सुरक्षित ठेवू शकली नाही: मार्क झुकेरबर्ग

mark zuckerberg

वॉशिंग्टन: फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गुरुवारी म्हटले की, यूझर्सच्या डेटा सिक्रसीबाबत माझ्या कंपनीने चूक केली. लोकांच्या खासगी डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी पावले उचलली जातील. सुमारे कोटी फेसबूक यूजर्सचा डेटा चोरून अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गैरवापर केल्याच्या खुलाश्यानंतर अमेरिकेच्या राजकाणातील भूकंप भारतापर्यंत पोहोचला.

झुकेरबर्ग यांनी लिहिले….
मी फेसबूक सुरू केले होतेया प्लॅटफॉर्मवर जे काही होते, त्यासाठी शेवटी मीच जबाबदार आहे. डाटा लीक रोखण्याबाबत मी गंभीर आहे.
यूजर्सचा डाटा लीक होण्यापासून रोखण्यासाठी फेसबूकच जबाबदार आहे.पण आम्ही त्यात अपयशी राहिलो.आम्ही तुम्हाला सेवा देण्याच्या लायकीचे नाही.
आता आमच्या कंपनीला बरेच काही करावे लागणार आहे.आम्ही चूक केली आहे.आवश्यक ती पावले उचलली जातील.आम्ही तसे करत आहोत.

तीन टप्प्यांत रोखणार डेटाचा गैरवापर
– झुकेरबर्ग म्हणाले, आम्ही तीन टप्प्यांमध्ये डेटाचा गैरवापर रोखणार आहोत.
१. माहिती देण्यापूर्वी आम्ही प्रत्येक अॅपची चौकशी करू. २०१४ मध्ये डेटा अॅक्सेससाठी आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर कमी केला आहे. काही संशयित आढळले तर कोणत्याही अॅपचे ऑडिट केले जाईल. डेव्हलपर ऑडिटसाठी तयार नसेल तर त्याला फेसबूकचे प्लॅटफॉर्म वापरू दिले जाणार नाही. कोणी माहितीचा गैरवापर करत आहे असे समजल्यास त्याला बॅन केले जाईल. लोकांनाही याबाबत माहिती दिली जाईल.
२. कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये किंवा अशी स्थिती रोखण्यासाठी डेव्हलपर्सना डेटा अॅक्सेस दिला जाणार नाही.
३. पुढच्या महिन्यात फेसबूक प्रत्येकाला त्यांच्या न्यूज फीडच्या टॉपवर एक टूल दाखवेल. युझरने ते वापरलेले आहे. अॅपची परमिशन रद्द करण्याची ती सोपी पद्धत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments