Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशओवेसींसमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणारी कोण आहे अमूल्या लियोना !

ओवेसींसमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणारी कोण आहे अमूल्या लियोना !

Amulya Leona say Pakistan Zindabad in Owaisi Rally, amulya leona, owisi, pakistan zindabaadनवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमूल्या लियोना या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लावल्या होत्या. यावरून देशभरात गोंधळ उडालेला आहे. हा प्रकार एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर झाला. पोलिसांनी अमूल्याविरुध्द १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिच्याविरुध्द राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे अमूल्या लियोना…

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या या तरुणीचं नाव आहे अमूल्या लियोना आहे. अमूल्या लियोना हिचं शालेय शिक्षण नॉरबेट सीबीएसई स्कूल आणि मणिपालच्या क्राईस्ट स्कूलमध्ये झालंय. बंगळुरूच्या एनएमकेआरव्ही महिला महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे.

ती एक ब्लॉगर म्हणूनही ओळखली जाते. ‘अलनोरोन्हा’ नावाचं तिचं एक वेगळं फेसबुक पेजही आहे. बंगळुरूच्या एका रेकॉर्डिंग कंपनीत तिनं ट्रान्सलेटर म्हणूनही कामही केलंय.

३१ जुलै २००० ला कर्नाटकच्या मैसूमध्ये अमूल्याचा जन्म झाला. अवघ्या २० वर्षांची अमूल्या सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह दिसते. NMKRVCW मधून तिनं बी.ए.जर्नालिझमचं शिक्षण घेतलं. तिला अभ्यासासोबत कविता लिहिण्याचाही छंद आहे.

यापूर्वीही आली होती चर्चेत…

अमूल्या चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. जानेवारी महिन्यात मंगळुरू एअरपोर्टवर ‘पोस्टकार्ड न्यूज’चे सह-संस्थापक महेश विक्रम हेगडे यांच्याकडे काही महिला ‘वंदे मातरम’ गाण्याची मागणी करताना दिसल्या होत्या. या महिलांमध्येही अमूल्या उपस्थित होती. आपली मागणी जोरदारपणे रेटताना ती दिसली होती. या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments