Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशसावधान : फेसबुक युजर्सचा डेटा ऑनलाइन लीक

सावधान : फेसबुक युजर्सचा डेटा ऑनलाइन लीक

Facebook data likवी दिल्ली :  केंद्र सरकार सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा आणण्याच्या प्रयत्नात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकच्या २६.७ कोटी युजर्सचा डेटा ऑनलाइन लीक झाला आहे. या युजर्सची व्यक्तिगत माहिती डॉर्क वेबवरील एका असुरक्षित डेटाबेसवर असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे फेसबुक युजर्समध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, जगभरात मोठ्या प्रमाणात फेसबुक वापरणा-यांची संख्या आहे. २६७,१४०,४३६ फेसबुक युजर्सचा आयडी, फोन नंबर आणि पूर्ण नाव एका असुरक्षित डेटाबेसमध्ये आढळून आल्याचं सायबर सेक्युरिटी फर्म असलेल्या Comparitech आणि रिसर्चर बॉब डियाचेंको यांनी म्हटलं आहे. या डेटाबेसमध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्यांना स्पॅम मेसेज पाठवले जात असून फिशिंग स्किम्समध्येही टार्गेट केलं जात असल्याचं या रिसर्च टीमच्या अहवालात म्हटलं आहे. परंतु, हा डेटा लीक झाल्याने किती संवेदनशील माहिती उघड झालीय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्क्रॅपिंगच्या बेकायदेशीर प्रक्रियेद्वारे फेसबुक युजर्सची व्यक्तिगत माहिती मिळविण्यात आल्याचं डियाचेंकोचा अंदाज आहे.

हा डेटाबेस गेल्या आठवड्यात ऑनलाइन हॅकर फोरमवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. हे ऑनलाइन हॅकर फोरमचे एका क्राइम ग्रुपशी संबंध असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. फेसबुकने मात्र डेटा लीक झाल्याच्या वृत्ताचा अद्याप इन्कार केलेला नाही. आम्ही या अहवालाची गंभीर दखल घेतली असून आमच्या स्तरावर तपास सुरू केला आहे, असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर हा डेटाबेस अॅक्सेसमधून काढून टाकण्यात आला आहे. फेसबुक युजर्सचा रेकॉर्ड दोन आठवडे या ऑनलाइन फोरमवर होता. हा डेटाबेस मिळवण्यासाठी कोणत्याही पासवर्डची गरज नव्हती. हा डेटाबेस थेट मिळवता येत होता.

यापूर्वी सप्टेंबरमध्ये ४० कोटीहून अधिक फेसबुक यूजर्सचे नंबर लीक झाले होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. आम्ही फेसबुकमध्ये काही बदल केले होते. त्यापूर्वीच त्यांनी ही माहिती उघड केली असावी असं वाटतं, असं फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments