Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeदेशभारतात १३ ते १४ जानेवारीपर्यंत लसीकरणास सुरूवात होणार

भारतात १३ ते १४ जानेवारीपर्यंत लसीकरणास सुरूवात होणार

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लसीकरणा संदर्भात एक मोठी माहिती देण्यात आली आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असं देखील  यावेळी  सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारपरिषदेत या संदर्भात माहिती देताना सांगितले, सरकार १० दिवसांच्या आतमध्ये करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात करण्यास तयार आहे. करोना वॅक्सीनला मंजुरी मिळालेली असल्याने दहा दिवासांच्या आत प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो.

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments