skip to content
Friday, May 17, 2024
Homeदेशभाजप आमदारावर बलात्काराच्या आरोपानंतर पीडितेच्या ‘पित्याचा’ संशयास्पद मृत्यू!

भाजप आमदारावर बलात्काराच्या आरोपानंतर पीडितेच्या ‘पित्याचा’ संशयास्पद मृत्यू!

Kuldeep singh, uttarpradeshउत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या महिलेच्या वडिलांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या महिलेने एक दिवसापूर्वीच म्हणजे रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस हवालदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर या महिलेच्या पित्याला पोलिसांनी काल अटक केली होती अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.

आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनीच पीडितेच्या वडिलांची हत्या घडवून आणली असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी रविवारी रात्री पीडित महिलेच्या पित्याला उन्नाव जिल्हा रूग्णालयात आणलं होतं. सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला अशी खात्रीलायक माहिती आहे. पण त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती मिळालेली नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी, तक्रार मागे घेतली नाही म्हणून 3 एप्रिल रोजीही आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली होती.

काय म्हणाली होती पीडिता
. पीडित महिलेने काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला.
.पीडित महिलेने उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील भाजप आमदार कुलदिपसिंह सेंगर आणि त्यांच्या भावावर बलात्काराचा आरोप केला होता.
. मी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत विनंती केली होती तरीही काही कारवाई झाली नाही. मी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला तेव्हाही मला धमकावण्यात आलं होतं.
.एका वर्षापासून न्यायासाठी पायपीट करत आहे, पण कोणीच दखल घेत नाही. अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.
.जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर मी स्वतःचं आयुष्य संपवेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments