कोलकाता: नंदीग्राम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना काल ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले होते. “मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते,” असं ममता बॅनर्जी त्यावेळी म्हणाल्या, भाजपने “हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये” असेही त्यांनी ठणकावले होते.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग म्हणाले की, ममता बॅनर्जी या फक्त ‘निवडणुकीपुरत्या हिंदू’ आहेत. गिरीराज सिंह म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या दडपणाखाली या स्तोत्रांचा जप केला आहे. “वाह रे मोदी, आज दीदी चंडीपाठ कर रही है, वाह रे मोदी, आज दीदी चुनाव जो ना कराए आपको (आज दीदी चंदीपाठाचे पठण करीत आहेत. ही निवडणूक तुम्हाला काय काय करायला लावत आहे ).”
भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी जरा घाबरल्या आहेत आणि त्यांना मशिदीत की मंदिरात जायचे हे माहित नाही.
हेही वाचा: रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?;नाना पटोलेंचा सवाल
लगेचच ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर, सुवेदू अधिकारी म्हणाले की, ममतांनी चुकीच्या मंत्राचा जाप केला आहे.
एका ट्वीटमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे की, ममता बॅनर्जी यांनी मंत्राचे पठण चुकीचे केले आणि “बंगालच्या संस्कृतीचे अपमान” केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या काळात विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात पार पडणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.