महत्वाचे…
१.नासाने विकसित केलेल्या आधुनिक टेक्ऩॉलॉजीमुळे आता आपत्तीपूर्वीच त्याची जाणीव होणार २.नासानं एक अधुनिक टूलची निर्मीती केली ३. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका
नवी दिल्ली : नासाने विकसित केलेल्या आधुनिक टेक्ऩॉलॉजीमुळे आता आपत्तीपूर्वीच त्याची जाणीव होणार आहे. नासानं एक अधुनिक टूलची निर्मीती केली आहे. या टूलद्वारे ग्लोबल वॉर्मिंगमुळे येणारा धोका आधीच ओळखू शकतो. नासाच्या एका रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांना बुडण्याचा धोका आहे. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका निर्माण झाल्याचे नासानं स्पष्ट केलं आहे.
नासाचा हा निष्कर्ष जगप्रसिद्ध ‘सायन्स’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मासिकामध्ये जगभरातील धोका असलेल्या शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील मुंबई आणि मंगरुळ या दोन शहरांचा समावेश आहे. नासाच्या रिपोर्टनुसार पुढील १०० वर्षांत मुंबईच्या समुद्र पातळीत १५.२६ से.मी. आणि मंगरुळच्या समुद्र पातळीत १५.९८ से.मी.ने वाढ होणार आहे. नासाने विकसित केलेल्या आधुनिक टेक्ऩॉलॉजीमुळे ही माहिती मिळणं शक्य झालं आहे. नासानं एकप्रकारे बदलणाऱ्या हवामानामुळे काय होऊ शकते याचा अंदाज आधीच सांगितला आहे. त्यामुळे, आपण वेळीच ग्लोबल वॉर्मिंगमुळे येणारा धोक्याची दखल घेतली पाहीजे.
नासानं विकसित केलेल्या टूलचं नाव ग्रॅडिएंट फिंगरप्रिंट मॅपिंग (जीएफएस) असे आहे. नासाच्या जेट प्रोप्यूलेशन लॅबोट्ररी, कॅलेफॉर्नियाच्या संधोधकांनी जीएफएस या टूलचा वापर जगभरातील 293 प्रमुख शहरावर केला. संधोधकांच्या मते मुंबई आणि न्यूयॉर्कपेक्षाही मंगरुळ शहराला आधिक धोका आहे. मंगरुळची परिस्थिती या दोन शहरापेक्षा आधिक बिकट आहे.