Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशअधिवेशानात नोटबंदी, जीएसटी, सईदच्या सुटकेवरुन सरकारला धारेवर धरणार - खरगे

अधिवेशानात नोटबंदी, जीएसटी, सईदच्या सुटकेवरुन सरकारला धारेवर धरणार – खरगे

नवी दिल्ली – अधिवेशनाची तारीख जाहीर होताच सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचे सांगितले आहे.

फसलेली नोटबंदी आणि घाईमध्ये लागू केलेला जीएसटीसोबतच दहशतवाद, जम्मू आणि काश्मीरचा मुद्दासुद्धा काँग्रेस उपस्थित करेल. तसेच मुंबईवरील हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याची नजरकैदेतून सुटका झाली आहे. या मुद्द्यावरसुद्धा विरोधी पक्ष सरकारला घेरेल, असे खरगे यांनी स्पष्ट केले आहे. अधिवेशनात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर पक्ष आधी चर्चा करेल असेही त्यांनी सांगितले.

गुजरात निवडणुकीचे दोन्ही टप्पे संपल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशानाला सुरुवात होणार आहे. १५ डिसेंबरला सुरु होणारे अधिवेशन ५ जानेवारीपर्यंत चालेल. हे अधिवेशन १४ दिवस चालणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments