Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशभीमा कोरेगावात याच वर्षी असं काय झालं,की गालबोट लागले: शरद पवार

भीमा कोरेगावात याच वर्षी असं काय झालं,की गालबोट लागले: शरद पवार

नवी दिल्ली मी मागील ५० वर्षांहून अधिक काळ भीमा कोरेगाव येथे दरवर्षी जमा होणारे लोक पाहतो. प्रत्येकवर्षी येथे हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात. इतक्या वर्षे शांततेत होणाऱ्या या कार्यक्रमात याचवर्षी असं काय झालं की त्याला गालबोट लागले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत उपस्थित केला.

द्विशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त लाखोंच्या संख्येने येथे लोक येणार होते, हे माहीत असतानाही प्रशासनाने काहीच काळजी घेतली नसल्याचे या घटनेवरून दिसते, असे म्हणत झालं गेलं विसरून जाऊन सर्वांनी एकसंध राहण्याची गरज आहे, असे आवाहन पवार यांनी केले. पवार म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मी हा कार्यक्रम पाहतो. गावातील सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने राहतात. या सोहळ्यानिमित्त येणाऱ्या लोकांची सेवाही स्थानिक लोक करताना मी पाहिलंय. दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी काही विशिष्ठ समुदायाचे लोक येथे येऊन गेले. दलित नेत्यांच्या सभेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. लाखो लोकांच्या संख्येने आलेल्यांवर दगडफेक करण्यात आली. राज्य सरकारने वेळी कारवाई केली असती, तर वातावरण बिघडले नसते. आता जे झालंय ते झालंय. आता दोन्ही समाजातील लोकांनी एकसंध राहण्याची आवश्यकता असून त्यांनी एकत्रित येत ही समस्या सोडवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारानंतर महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीचे पडसाद आजही (गुरूवार) संसदेत पाहायला मिळाले. राज्यसभेत प्रारंभी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी याविषयी आपले मत मांडले. त्यानंतर शरद पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रश्नी आपली भूमिका मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments