Saturday, October 12, 2024
Homeदेशटीपू जयंती'च्या विरोधात तोडफोड, परिसरात जमावबंदी लागू

टीपू जयंती’च्या विरोधात तोडफोड, परिसरात जमावबंदी लागू

महत्वाचे…
१. कर्नाटक सरकारकडून ‘टीपू जयंती’ समारंभाचे आयोजन २. दोन वर्षापूर्वी सरकारने टीपू जयंती करायला केली सुरुवात ३. भाजपासह काही संघटनांचा विरोध,चोख पोलिस बंदोबस्त.


बंगळुरू – म्हैसूरचे १८ व्या शतकातील राजे टीपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज कर्नाटक सरकारकडून ‘टीपू जयंती’ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संपुर्ण शहरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पण, तरिही सकाळपासून तोडफोडीच्या घटनांची माहिती मिळत आहे.

मडीकेरीमध्ये कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. कोडगुमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शहरात राज्य सरकारच्यावतीने आयोजित कार्यक्रमा व्यतिरिक्त कोणत्याही मिरवणुकीला परवानगी असणार नाही.
बंगळुरूचे पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी म्हटले आहे की, आम्ही टीपू जयंतीच्या समर्थनार्थ अथवा विरोधातील कोणत्याही मिरवणुकीसाठी परवानगी देत नाही. सरकारकडून शहरातील विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आली आहे.

११ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कुमार यांनी सांगितले की, कर्नाटक राज्य रिझर्व पोलीस (केएसआरपी) च्या ३० तुकड्यांसह २५ सशस्त्र दल तुकड्या आणि शहर पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपुर्ण शहरात ११ हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त होमगार्डचे जवान देखील असणार आहेत.

भाजप व अन्य संघटनांचा विरोध
त्यांनी सांगितले की, जे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. राज्याच्या सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने दोन वर्षांपुर्वी टीपू जयंती साजरी करायला सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्ष, काही दक्षिणपंथी गट आणि कोडावा समुहाच्या सदस्यांनी या समारंभासाठी विरोध करत टीपू एक धार्मिक ‘‘कट्टरवादी’’ असल्याचे म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments