Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशताज महाल हा मकबराच, मंदिर नाहीच- पुरातत्व खाते!

ताज महाल हा मकबराच, मंदिर नाहीच- पुरातत्व खाते!

दिल्ली: ताज महाल हा शहाजहानची पत्नी मुमताज महल हिचा मकबराच असल्याचं स्पष्टीकरण आज पुरातत्व विभागाने आज आग्रा कोर्टात दिलं आहे. यामुळे ताजमहल एक शिव मंदिर असल्याच्या वादावर आता पडदा पडलाय.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा व त्यांच्या पक्षाशी संबधित लोकांनी ताजमहाल च्या ठिकाणी मंदिर होता. अशी ओरड सुरु केली होती. वारंवार असा वाद उपस्थित करुन देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रकार होत आहेत. काही वर्षांपूर्वी ताज महाल  एक शिव मंदिर असून त्याला तसाच दर्जा द्यावा अशी एक याचिका काही वकिलांनी आग्रा कोर्टात दाखल केली होती. यासंदर्भात आधी सांस्कृतिक मंत्रालयानेही संशोधन केलं होतं. तेव्हा त्यांनीही  इथे कुठलंच मंदिर कधीच  नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.  याचिकाकर्त्यांनी यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचीही बाब मांडली होती. पण त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांना कुठलाच आधार नसून ते सगळेच पुरावे काल्पनिक असल्याचं पुरातत्व विभागाने स्पष्ट केलंय. ताज महाल २००७ साली जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक  असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तसंच युनेस्कोने ताज महालला जागतिक वारसा घोषित केला आहे. स्थानिक शिवसेनेनेही हे मंदिर तेजोमहल नावाचं मंदिर असल्याचा दावा केला होता. या सगळ्याचं मुळ पु.ना.ओक यांच्या पुस्तकात असल्याचंही पुरातत्व विभागाने स्पष्ट केलं. तसं जरी असलं तरी या गोष्टीला कुठलाच वास्तविक आधार नसल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments