नंदुरबार : दलित अत्याचाराविरोधी कायदा(अॅट्रॉसिटी)कायद्यासाठी पुकारलेल्या’भारत बंद’जिल्ह्यातील शहाद्यात हिंसक वळण लागले आहे. शहादा-पाडदळा बस डेपोबाहेर निघत असताना संतप्त जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत चार बसच्या काचा फुटल्या.
नंदुरबार शहरात भीम प्रेमींनी मोटारसायकल रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.शहादा व नंदूरबार शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान,अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. भारत बंदचे पडसाद सर्वत्र उमटले असून काही राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जाळपोळ,दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.