नवी दिल्लीः कर्नाटकमधील काँग्रेसचे संकटमोचक माजी मंत्री डीके शिवकुमार यांना भेटण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आज तिहार कारागृहात गेल्या होत्या. शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने अटक केल्यापासून ते तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदीस्त आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज सकाळी कर्नाटकमधील काँग्रेस नेते शिवकुमार यांची तिहार कारागृहात जाऊन भेट घेतली. शिवकुमार यांना ईडीने काही आठवड्यापूर्वी अटक केली होती. डीके सध्या तिहार कारागृहात बंद आहेत.
सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आयएनएक्स मीडिया प्रकरणात आरोप असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार कारागृहात जाऊन भेट घेतली होती. शिवकुमार यांना अटक केल्यापासून ते तिहार कारागृहात बंदीस्त आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.