Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम बुद्ध सारखेच - परेश रावल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम बुद्ध सारखेच – परेश रावल

महत्वाचे…
१.राज्यात जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल. हे पाप आणि अनैतिक ठरेल’ २. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती मिळणं कठीण ३. जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल


राजकोट – भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना गौतम बुद्धाशी केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत गौतम बुद्धासारख्या नरेंद्र मोदींच्या मायभूमीत जात आणि धर्माच्या आधारे मतदान करणं पाप आणि अनैतिक ठरेल‘, असं परेश रावल बोलले आहेत. राजकोटमध्ये मन की बात, चाय के साथकार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी परेश रावल यांनी उपस्थितांना प्रश्नही विचारला की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा असावा की राहुल गांधींसारखा’. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती मिळणं कठीण आहे. खूप पूजा आणि प्रार्थना केल्यानंतरच अशी व्यक्ती मिळते. असं विराट व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती अवतार घेते. राजकारणातून अशी व्यक्ती जन्म घेऊच शकत नाही. जी व्यक्ती गौतम बुद्धांप्रमाणे आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन देशसेवा करण्यात व्यस्त आहे त्या आपण त्या व्यक्तीच्या राज्यात जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल. हे पाप आणि अनैतिक ठरेल. आपण असं करु शकत नाही. आपण सरदार पटेल आणि महात्मा गांधींच्या मायभूमीवरील लोक आहोत’, असं परेश रावल बोलले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments