Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशकर्नाटकाच्या आखाड्यात शिवसेनेने भाजपा विरोधात दंड थाेपटले!

कर्नाटकाच्या आखाड्यात शिवसेनेने भाजपा विरोधात दंड थाेपटले!

कर्नाटक: उत्तर प्रदेश, गोवापाठोपाठ कर्नाटकातही शिवसेनेने भाजपाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर सीमा भागात शिवसेना निवडणूक लढवणार नसून महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना पाठिंबा देईल, अशी घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाची चांगलीच गोची होईल.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी केली होती. देशातील अन्य राज्यांमध्येही शिवसेना स्वबळावरच लढेल, अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटकची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत शिवसेनेने भाजपाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.

बेळगावमधील सीमा भागात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार नाही, या भागात इतर पक्षांनीही निवडणूक लढवू नयेत. जोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावे, अशी मागणीच त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा, तरच ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतील, असे सांगत त्यांनी फडणवीस यांना आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments