Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
HomeदेशUS Capitol हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार संतापल्या, म्हणाल्या...

US Capitol हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार संतापल्या, म्हणाल्या…

मुंबई : अमेरिकेत काल मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून राडा riot केला. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात चार आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. आंदोलकांपैकी एकाच्या हातात भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. त्यावरुन शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी  चांगल्याच संतापल्या.

हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका 

आंदोलकांपैकी एकाच्या हातात तिरंगा दिसल्यानंतर, “जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्‍या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका”, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याशिवाय भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीही या घटनेवर सवाल उपस्थित केलेत.

वरुण गांधी यांनी ट्विटरद्वारे, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल विचारलाय. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये असंही गांधी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments