Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशभाजपच्या १२० नेत्यांची यादी ईडीकडे सोपवणार : संजय राऊत

भाजपच्या १२० नेत्यांची यादी ईडीकडे सोपवणार : संजय राऊत

मुंबई l शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर  जोरदार टिकास्त्र सोडलं.

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

“या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l  मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील;संजय राऊतांचा भाजपला इशारा

देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहेत्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मला नोटीस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments