Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशमोदी नवाज शरिफांना भेटू शकतात तर मग आम्ही ममतांना का नाही -...

मोदी नवाज शरिफांना भेटू शकतात तर मग आम्ही ममतांना का नाही – संजय राऊत

Sanjay Raut, Shiv Sena, Mamta Banarjeeनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या नवाज शरिफांना भेटू शकतात तर मग आम्ही ममता बॅनर्जींना का भेटू शकत नाही, असा सणसणीत सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दिल्लीत घेतलेल्या भेटीवरून होत असलेल्या टीकेवर बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या नवाज शरिफांना भेटू शकतात तर मग आम्ही ममता बॅनर्जींना का भेटू शकत नाही? त्या भारतीय असून एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. तसेच एकाकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. आज भाजपला ममता अस्पृश्य वाटत आहेत, पण जर त्या भाजपसोबत असत्या तर अस्पृश्य वाटल्या असत्या का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments