Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeदेश'रोटोमॅक'च्या कोठारीचा कर्जघोटाळा ३ हजार ६९५ कोटींचा!

‘रोटोमॅक’च्या कोठारीचा कर्जघोटाळा ३ हजार ६९५ कोटींचा!

नवी दिल्ली: रोटोमॅक पेन या प्रसिद्ध कंपनीचा मालक विक्रम कोठारीने केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. कोठारीने देशातील सात आघाडीच्या बँकांचे ३ हजार ६९५ कोटी रुपये बुडवल्याचे आता सीबीआय तपासातून उघड झाले आहे.

विक्रम कोठारीचा घोटाळा ८०० कोटींचा असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र, याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने आज संबंधित कागदपत्रांची छाननी केली असता हा घोटाळा ३ हजार ६९५ कोटींचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीबीआयने आज कानपूरमधील कोठारीच्या अनेक ठिकाणांवर छापे मारले आहेत. यावेळी कोठारी, त्याची पत्नी आणि मुलाचीही कसून चौकशी करण्यात आली. कोठारीने ७ बँकांकडून २ हजार ९१९ कोटी रुपये इतके कर्ज घेतले होते आणि सध्या थकबाकीची रक्कम ३ हजार ६९५ कोटींवर पोहोचली आहे, असे या चौकशीतून तसेच कागदपत्रांच्या छाननीतून समोर आले.
कोठारीने बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स अशा सात बँकांना गंडा घातला आहे. दरम्यान, नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सीने ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा करून देशाबाहेर पलायन केले असताना त्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments