Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशलालू प्रसाद यादव यांची कमी शिक्षेची मागणी

लालू प्रसाद यादव यांची कमी शिक्षेची मागणी

रांची – चारा घोटाळ्यातील  एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना आज शुक्रवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. थोड्याच वेळात न्यायालय आपला निर्णय सुनावणार आहे.

गुरुवारी सकाळी लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र, त्यांना सुनावण्यात येणारी शिक्षा टळली आणि त्यांची पुन्हा रांचीमधील बिरसा मुंडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.  दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या वकिलाने रांची विशेष सीबीआय न्यायालयात याचिका केली असून, तब्बेतीच्या कारणामुळे कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments